कोणीही कॉंग्रेस सोडू नका: कुमार सप्तर्षी 

कोणीही कॉंग्रेस सोडू नका: कुमार सप्तर्षी 

कऱ्हाड (सातारा) : कॉंग्रेस संपली असे कोणाला वाटत असेल तर तो त्यांचा भ्रम आहे. कॉंग्रेस आज कात टाकून नवीन होऊ लागली आहे. त्यामुळे कोणी कॉंग्रेस सोडून जावू नका, असे आवाहन ज्येष्ठ समाजवादी नेते कुमार सप्तर्षी यांनी केले. 

(कै.) प्रेमलाताई चव्हाण एज्युकेशन फाऊंडेशन व जिल्हा कॉंग्रेस कमिटीतर्फे (कै.) आनंदराव चव्हाण व प्रेमलाताई चव्हाण यांच्या स्मृतिदिनानिमित्त आयोजित कार्यक्रमात सप्तर्षी बोलत होते. यावेळी माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण, आमदार आनंदराव पाटील, माजी आमदार मदन भोसले यांची प्रमुख उपस्थिती होती. 

श्री. सप्तर्षी म्हणाले, "सध्या संपूर्ण देशात दहशतीचे वातावरण आहे. इंदिरा गांधींनी देशात आणिबाणी लागू केली आणि पुन्हा देशाची माफी मागितली होती. त्यामुळे या देशाने त्यांना पुन्हा सत्तास्थानी बसवले होते. अशीच नेमकी परिस्थिती भविष्यात निर्माण होईल. आनंदराव आणि प्रेमलाताई चव्हाण हे मूळचे शेतकरी कामगार पक्षाच्या विचारधारेत वाढले होते. मात्र, कॉंग्रेसने त्या पक्षाची ध्येय, धोरणे स्वीकारल्यामुळे ते कॉंग्रेसवासी झाले. त्यांनी अखेरच्या श्‍वासापर्यंत कॉंग्रेसची विचारधारा जपली. त्यांचाच वारसा पुढे पृथ्वीराज चव्हाण यांनी कॉंग्रेसच्या पडत्या काळातही अखंडितपणे सुरू ठेवला आहे.'' 

पृथ्वीराज चव्हाण म्हणाले,"आगामी निवडणुकीत पुन्हा भाजपची सत्ता आल्यास हुकूमशाही राजवट तयार होईल. पुन्हा कधीही निवडणुका होणार नाहीत. त्यांची प्रवृत्ती लक्षात घेऊन त्यांना त्यांची जागा दाखवण्याची हीच वेळ आहे.'' आमदार आनंदराव पाटील यांनी प्रास्ताविक केले. नगरसेविका स्मिता हुलवान यांनी आभार मानले.

यावेळी संजय बालुगडे, ऍड. सुरेश कुऱ्हाडे, महिला कॉंग्रेसच्या रजनी पवार, धनश्री महाडिक, बाळासाहेब बागवान, जगन्नाथ शिंदे, अजित पाटील, हिंदूराव पाटील, राहुल घाडगे, जिल्हा परिषद सदस्य शंकरराव खबाले, निवास थोरात उपस्थित होते. 

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com