भाजपचे जिल्हाध्यक्ष कुमार आयलानी सेना खासदार शिंदेंच्या भेटीला! उल्हासनगरमध्ये सेेनेची मोर्चेबांधणी

भाजपचे जिल्हाध्यक्ष कुमार आयलानी सेना खासदार शिंदेंच्या भेटीला! उल्हासनगरमध्ये सेेनेची मोर्चेबांधणी

कल्याण : कल्याण-डोंबिवली महापालिका निवडणुकीअगोदर काडीमोड घेत सत्तास्थापनेसाठी सेना-भाजपची एकी झाली. त्यानंतर उल्हासनगर पालिका निवडणुकीत काडीमोड घेत दोन्ही पक्ष वेगळी चूल मांडून संसार करत आहेत. तसेच विधानसभा मतदारसंघाच्या दावेदारीवरून भाजपमध्येच गोंधळ सुरू असताना नुकतीच भाजपचे माजी आमदार कुमार आयलानी यांचे पुत्र धीरज यांनी शिवसेना खासदार डॉ. श्रीकांत शिंदे यांची भेट घेतली. त्यामुळे राजकीय चर्चांना उधाण आले आहे.

सोईनुसार काडीमोड आणि जवळीक साधण्याचा खेळ शिवसेना आणि भाजप वारंवार खेळत आहे. त्यामुळे आगामी लोकसभा विधानसभा निवडणुकीत हे दोन्ही पक्ष युती करणार की नाही, याबाबत खलबत सुरू आहे. उल्हासनगर विधानसभा मतदारसंघातून भाजपकडून आयलानी आणि कलानी ही दोन्ही कुटुंबे मुख्य दावेदार असणार आहेत. त्यात कलानी कुटुंबाचे वाढते वजन आणि मुख्यमंत्र्यांशी असलेली जवळीक ही आयलानी कुटुंबीयांसाठी डोकेदुखी ठरत आहे.

मोदीलाट असतानाही ज्योती कलानी यांनी उल्हासनगर विधानसभा मतदारसंघातून राष्ट्रवादीच्या तिकिटावर निवडणूक लढवत बाजी मारली होती. त्यामुळे आता या कलानी कुटुंबाला हाताशी धरून या मतदारसंघात शतप्रतिशत भाजपची सत्ता प्रस्थापित करण्याचा चंग भाजपाने बांधला असल्याचे बोलले जात आहे. 

कमळ फुलविण्याचे भाजपचे मनसुबे


उल्हासनगर येथे वर्चस्व निर्माण करण्यासाठी भाजपने उल्हासनगर महापालिका निवडणुकीत गुंड पप्पू कलानीचा मुलगा ओमी यांच्याशी हातमिळवणी केली. आता भाजपचा डोळा उल्हासनगर विधानसभा क्षेत्रावर आहे. या ठिकाणीही कमळ फुलवायचे, असे मनसुबे भाजपने आखले आहेत. या पार्श्वभूमीवरच ओमी यांच्या पत्नी पंचम कलानी यांना महापौरपद दिल्याची चर्चा आहे.

मुख्यमंत्र्यांसमोर पेच 
कलानी आणि आयलानी यांच्यातील मतभेद सर्वश्रुत आहेत. भाजपच्या तिकिटावरून निवडणूक लढवण्यासाठी आपण इच्छुक असल्याचे कुमार आयलानी यांनी "सकाळ'शी बोलताना स्पष्ट केले. त्यामुळे आयलानी आणि कलानी यांच्यात आगामी काळात जोरदार रस्सीखेच होणार आहे. या पार्श्‍वभूमीवर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यासमोर उमेदवारी देण्याबाबत पेच निर्माण होणार आहे 

खासदार शिंदे यांची भेट दिवाळीच्या शुभेच्छा देण्यासाठी घेतली. तसेच आमच्या कुटुंबाने मुख्यमंत्र्यांचीही भेट घेतली आहे. सेना-भाजप मित्रपक्ष आहेत. भाजपच्या तिकिटावर निवडणूक लढविण्यास मी इच्छुक आहे, असे
कुमार आयलानी यांनी सांगितले. तर दिवाळीच्या शुभेच्छा देण्यासाठी ही भेट होती. राजकारणात कधी काय घडेल, याचा नेम नाही. काहीही होऊ शकते आणि कोणी कुठेही जाऊ शकतो, असे श्रीकांत शिंदे यांनी सांगितले.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com