kulbhushan jadhav | Sarkarnama

कुलभूषण जाधव यांच्या फाशीला स्थगिती, पाकला झटका

वृत्तसंस्था
गुरुवार, 18 मे 2017

हेग : कुलभूषण जाधव यांच्या फाशीला आंतरराष्ट्रीय न्यायालयाने आज स्थगिती दिली. न्यायालयाच्या या निर्णयाने पाकिस्तानला जोरदार झटका बसला आहे. आमचा अंतिम निकाल येई पर्यंत पाकिस्तानला शिक्षेची अंमलबजावणी करता येणार नसल्याचे न्यायालयाने स्पष्टपणे पाकिस्तानला बजावले आहे. 

जाधव यांना पाकिस्तानमध्ये हेरगेरी केल्याच्या आरोपावरून अटक करण्यात आली होती. पाकिस्तानातील न्यायालयाने त्यांना फाशीची शिक्षा सुनावली आहे. जाधव यांची फाशीची शिक्षा रद्द करावी अशी मागणी भारताने आंतरराष्ट्रीय न्यायालयात केली होती. भारतातीलच एक ज्येष्ठ विधितज्ज्ञ हरिश साळवे यांनी न्यायालयात जाधव यांची बाजू मांडली होती. न्यायालयाने जाधव यांच्या फाशीला स्थगिती देत पाकिस्तानला मोठा झटका दिला आहे. न्यायालयाच्या या निणयाचे भारताने स्वागत केले आहे. मात्र पाकिस्तानने आपला थयथयाट सुरू केला आहे. 
 
संबंधित लेख