kulbhushan jadhav | Sarkarnama

कुलभूषणला जाधवला बाजू मांडण्यासाठी पाकची तयारी

वृत्तसंस्था
शनिवार, 13 मे 2017

इस्लामाबाद : कुलभूषण जाधव यांच्याप्रकरणी आंतरराष्ट्रीय न्यायालयात जोरदार बचाव करण्यासाठी पाकिस्तान जोरदार तयारी करत असल्याची माहिती माध्यमांमधील सूत्रांनी दिली आहे. भारतीय नौदलाचे माजी अधिकारी असलेल्या जाधव यांच्यावर हेरगिरीचा आरोप ठेवून पाकिस्तानने त्यांना फाशीची शिक्षा सुनावल्यानंतर भारताने आंतरराष्ट्रीय न्यायालयात धाव घेतली आहे. 

येथील माध्यमांनी दिलेल्या माहितीनुसार, जाधव यांच्याविरोधात बाजू मांडण्याबाबतचा आराखडा तयार करण्यासाठी पंतप्रधान नवाज शरीफ यांनी विविध तज्ज्ञांकडून शिफारशी मागविल्या होत्या. पाकिस्तानचे ऍटर्नी जनरल अश्‍तार औसफ यांनीही आपल्या शिफारशी शरीफ यांच्याकडे पाठविल्या आहेत. पाकिस्तानने विविध शक्‍यतांचाही आढावा घेण्यास सुरवात केली आहे. भारताने याचिका दाखल केल्यानंतर आंतरराष्ट्रीय न्यायालयाने जाधव यांना सुनावलेल्या फाशीच्या शिक्षेला स्थगिती दिली आहे. त्यामुळे पाकिस्तानने आपली बाजू कशाप्रकारे मांडावी, याबाबत सूचना औसफ यांनी केल्या आहेत. गोपनीयतेच्या कारणास्तव यातील सूचना सांगण्यास त्यांनी नकार दिला. औसफ यांनी गेले दोन दिवस लष्कर आणि परराष्ट्र मंत्रालयातील विविध वरिष्ठ अधिकाऱ्यांबरोबर स्वतंत्रपणे बैठकी घेतल्या. हेग येथील आंतरराष्ट्रीय न्यायालयात तेच पाकिस्तानतर्फे बाजू मांडण्याची शक्‍यता आहे. या न्यायालयामध्ये 15 मे रोजी सुनावणी होणार आहे. 

संबंधित लेख