मी पूर्णपणे टेन्शन फ्री आहे : कुमारस्वामी 

कॉंग्रेसचे प्रभारी के. सी. वेणुगोपाल यांच्याशी चर्चा करण्यापूर्वी ते पत्रकारांशी बोलत होते.
मी पूर्णपणे टेन्शन फ्री आहे : कुमारस्वामी 

बंगळूर: युती सरकार स्थिर असून मला कोणतेच टेन्शन नाही, असे मुख्यमंत्री कुमारस्वामी यांनी स्पष्ट केले. 

गेल्या आठवडाभरात होत असलेल्या राजकीय घडामोडी पाहून एन्जॉय करीत असल्याचे त्यांनी सांगितले. कॉंग्रेसचे प्रभारी के. सी. वेणुगोपाल यांच्याशी चर्चा करण्यापूर्वी ते पत्रकारांशी बोलत होते. ते म्हणाले, "मी पूर्णपणे टेन्शन फ्री आहे. भाजप आखत असलेल्या तंत्राविरुध्द प्रतितंत्र आखण्याची कोणतीच गरज नाही. भाजपबरोबर किती आमदार आहेत, याची चिंता करण्याची मुळीच गरज नाही. आम्हाला संख्याबळाची काळजी नाही. सर्व आमदार आमच्या संपर्कात आहेत. अपक्ष आमदारांनी पाठिंबा मागे घेतल्याचीही चिंता नको. त्यांच्याशी माझा कोणताच संबंध नाही. युती सरकारला कॉंग्रेस नेत्यांचा पाठिंबा आहे. सर्व असंतुष्ट आमदार आपल्या संपर्कात असल्याचे सांगून काळजी करण्याची गरज नाही.' 

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com