मतदान प्रक्रियेत दिसले नाहीत पण मतदानानंतर क्षीरसागर हसले

 मतदान प्रक्रियेत दिसले नाहीत पण मतदानानंतर क्षीरसागर हसले

बीड : राजकीय ताकदवान आणि डावपेचात माहिर असलेल्या नगराध्यक्ष डॉ. भारतभूषण क्षीरसागर यांनी सोमवारी कोणावर डाव टाकला हे अद्याप उघड नाही. मात्र, स्थानिक स्वराज्य संस्था मतदार संघ निवडणुकीच्या प्रक्रियेत कुठेच न आढळलेले डॉ. क्षीरसागर मतदान करुन आल्यानंतर मात्र हसतमुख होते. बीड नगर पालिकेच्या राजकारणात सक्रीय असलेल्या डॉ. भारतभूषण क्षीरसागर यांनी अपवाद वगळता पालिकेवर कायम सत्ता ठेवलेली आहे. 

पालिकेचे नगराध्यक्षपद त्यांच्यासह पत्नी डॉ. दीपा क्षीरसागर किंवा त्यांच्या समर्थकांकडेच राहिलेले आहे. थेट नगराध्यक्ष निवडणुकीत दोन वेळा त्यांनी बाजी मारली. जिल्ह्यात सर्वाधिक काळ नगराध्यक्षपद भूषविलेल्या डॉ. भारतभूषण क्षीरसागर यांची जिल्ह्यात अध्यक्ष अशीच ओळख आहे. मात्र, अलिकडच्या काळात ते राष्ट्रवादी पक्षातल्या नेत्यांकडून दुखावलेले आहेत. 

पक्षाच्या जिल्हाध्यक्षपदावरुन दुर करण्यासह पुतणे संदीप क्षीरसागर यांना दिलेले बळ ही त्यांच्या नाराजीची कारणे आहेत. दरम्यान, स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुकीच्या धामधुमीत पक्षाच्या कुठल्याच प्रक्रियेत क्षीरसागर आढळले नाहीत. त्यामुळे त्यांची मदत कोणाला अशी चर्चा सुरुवातीपासून होती. त्यातच दोन दिवसांपूर्वी पुतणे संदीप क्षीरसागर गटाचे आठ आणि एमआएमचे दोन नगरसेवक राज्यमंत्र्यांनी बडतर्फ केल्याने त्यांच्या गोटात आनंदी वातावरण आहे. राष्ट्रवादीवर नाराज असलेले नगराध्यक्ष डॉ. क्षीरसागर दुपारी बीडच्या मतदान केंद्रावर समर्थक नगरसेवकांसह पोचले. बाहेर आल्यानंतर त्यांच्या चेहऱ्यावरील हास्य सर्व काही सांगून जात होते. 

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com