KRUSHNKANT KUDALE NO MORE | Sarkarnama

समता परिषदेचे कार्याध्यक्ष कृष्णकांत कुदळे यांचे निधन

सरकारनामा ब्यूरो
रविवार, 10 फेब्रुवारी 2019

पुणे : अखिले भारतीय महात्मा फुले समता परिषदेचे कार्याध्यक्ष, राष्ट्रवादी काॅंग्रेसचे प्रदेश उपाध्यक्ष कृष्णकांत कुदळे (वय 75) याचे आज येथे निधन झाले. पुण्यातील सार्वजनिक जीवनात सतत व्यस्त असणारे कुदळे हे अनेक संस्थांशी संबंधित होते. माजी उपमुख्यमंत्री छगन भुजबळ यांनी कुदळे यांच्या निधनाबद्दल शोक व्यक्त केला असून कुदळे यांच्या जाण्याने खरा समता सैनिक हरपल्याची भावना त्यांनी व्यक्त केली.

कुदळे यांचे पुणे फेस्टिव्हलच्या संयोजनात महत्त्वाचा सहभाग होता. माळी शुगर फॅक्टरीचे ते चेअरमन होते. अखिल भारतीय माळी शिक्षण परिषदेचे ते अध्यक्ष होते. 

पुण्याच्या सार्वजनिक जीवनात कुदळे यांनी स्वतःचे एक स्थान निर्माण केले होते. महाराष्ट्र राज्य पर्यटन विकास महामंडळ, डेक्कन एज्युकेशन सोसायटी, कृष्णकांत कुदळे नागरी पतसंस्था, पुणे फेस्टिवल, पथिक परिवार, या सारख्या अनेक संस्था व संघटनांच्या माध्यमातून त्यांनी  काम उभे केले होते. अनेक मान्यवर क्रिकेटपटू, कलावंत, चित्रपट अभिनेते यांच्याशी त्यांचे अगदी जवळचे संबंध होते.

संबंधित लेख