krushan koyana, dam, mumbai | Sarkarnama

कृष्णा कोयना सिंचनसाठी  5 हजार कोटींची मान्यता

सरकारनामा ब्युरो 
सोमवार, 3 जुलै 2017

मुंबई : मागील 28 वर्षांपूर्वी केवळ 82 कोटींच्या घरात असलेला कृष्णा कोयना उपसा सिंचन प्रकल्प आता पाच हजार कोटींच्या जवळपास म्हणजेच 4959.91 कोटी रुपयांपर्यंत पोहचला असून त्यासाठी आज मंत्रिमंडळाच्या बैठकीत यासाठी सुधारित प्रशासकीय मान्यता देण्यात आली आहे. 

मुंबई : मागील 28 वर्षांपूर्वी केवळ 82 कोटींच्या घरात असलेला कृष्णा कोयना उपसा सिंचन प्रकल्प आता पाच हजार कोटींच्या जवळपास म्हणजेच 4959.91 कोटी रुपयांपर्यंत पोहचला असून त्यासाठी आज मंत्रिमंडळाच्या बैठकीत यासाठी सुधारित प्रशासकीय मान्यता देण्यात आली आहे. 

कृष्णा कोयना उपसा सिंचन प्रकल्पाच्या अंतर्गत ताकारी, म्हैसाळ अशी दोन उपसा सिंचन योजना आहेत. या योजनेच्या विकासा साठी 4959.91 कोटी रुपयांची मान्यता देण्यात आली आहे. या प्रकल्पाचे 56 टक्के काम अद्याप अपूर्ण असून ते 2019 पर्यत पूर्ण करायचे असून त्याचा फायदा या परिसरात सांगली व सोलापूर जिल्ह्यातील 300 दुष्काळग्रस्त गावांना होणार असल्याची माहिती जलसंपदा मंत्री गिरीश महाजन यांनी दिली. 

ताकारी उपसा सिचन योजनेचा उदभव कृष्णा नदीवर ताकारी गावाजवळ असून या योजनेद्वारे एकूण 4 टप्प्यांमध्ये (स्थिर उंची 219 मी.) 9.34 अब्ज घन फूट पाणी उचलून त्याद्वारे सांगली जिल्ह्यातील खानापूर, तासगाव, मिरज, पलूस, कडेगाव आणि वाळवा या तालुक्‍यातील एकूण 27,430 हेक्‍टर क्षेत्राला यामुळे लाभ होणार आहे. तर म्हैसाळ उपसा सिंचन योजनेचा उदभव हा म्हैसाळ गावाजवळ असून या योजनेद्वारे एकूण 6 टप्प्यामध्यें (स्थिर उंची 269 मी.) 17.44 अघफू पाणी उचलून त्याद्वारे सांगली जिल्ह यातील मिरज कवठेमहांकाळ, तासगाव, जत व सोलापूर जिल्ह्यातील सांगोला व मंगळवेढा तालुक्‍यातील 81.897 हेक्‍टर क्षेत्राला या सिंचनाचा लाभ होणार असल्याची माहितीही महाजन यांनी दिली. 

तसेच नवी मुंबई विमानतळ प्रभावित क्षेत्रात येणाऱ्या 270 गावातील पाण्याची गरज लक्षात घेऊन जलसंपदा विभागाकडे असलेला कोंढाणे प्रकल्प सिडकोला मालकी हक्काने देण्याचा निर्णयही घेण्यात आला आहे. तर हा प्रकल्प आता पाणी पुरवठा प्रकल्प म्हणून घोषित करण्याचा निर्णयही मंत्रीमंडळाच्या बैठकित घेण्यात आला असल्याची माहितीही महाजन यांनी दिली. 

संबंधित लेख