krupashankar sing and bjp | Sarkarnama

ब्रेकिंग न्यूज

विनोद तावडे कृष्णकुंजवर . राज ठाकरे आणि विनोद तावडे यांच्यात चर्चा .

कृपाशंकर सिंह भाजपच्या वाटेवर ? मुख्यमंत्र्यांच्या भेटीने भुवया उंचावल्या !

सिद्धेश्वर डुकरे
शुक्रवार, 14 सप्टेंबर 2018

मुंबई : मागील काही दिवसापासून कॉंग्रेसमधे विजनवासात गेलेले कॉंग्रेसचे माजी मंत्री कृपाशंकर सिंह सध्या चर्चेत आले आहेत. मात्र ते चर्चेत आले आहेत ते वेगळ्याच कारणाने. ते भाजपच्या वाटेवर असल्याची चर्चा पुन्हा सुरू झाली आहे. 

या चर्चेला पुष्टी मिळाली ती म्हणजे गुरुवारी रात्री मुख्यमंत्र्यांनी कृपाशंकर सिंह यांच्या वांद्रे येथील निवासस्थानी त्यांच्या घरच्या गणपतीचे दर्शन घेतले. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी वेळात वेळ काढून सिंह यांच्या घरी हजेरी लावल्याने कृपाशंकर भाजपच्या वाटेवर असल्याच्या चर्चेला बळ मिळत आहे. 

मुंबई कॉंग्रेसचे माजी अध्यक्ष कृपाशंकर सिंह यांच्यावर बेहिशेबी मालमत्ता प्रकरणी आघाडी सरकारच्या काळात चौकशी सुरू होती. त्यामुळे ते अडचणीत आले होते. मात्र त्यांना कोकणातील शेकडो एकर जमिनीच्या प्रकरणात नुकतीच क्‍लीन चिट मिळाली असून अन्य प्रकरणात अजूनही ते चौकशीचा फेऱ्यात आहेत. आघाडीचे सरकार पायउतार झाल्यानंतर विद्यमान मुंबई कॉंग्रेस अध्यक्ष संजय निरुपम यांच्या सोबत ही कृपाशंकर सिंह यांचे जमले नाही. 

कॉंग्रेसच्या अनेक कार्यक्रमापासून सिंह दूर राहणेच पसंत करतात. यादरम्यान कॉंग्रेसचे दिवंगत माजी अध्यक्ष गुरुदास कामत यांच्या कार्यकर्त्यांनीही निरुपम यांच्यावर नाराजी दाखवत पक्षाच्या कार्यक्रमांकडे अनेकदा पाठ फिरवली आहे. निरुपम यांच्यावर नाराजी व्यक्त करत याआधी माजी आमदार कृष्णा हेगडे यांनीही भाजप मध्ये प्रवेश केला असून, आता कृपाशंकर सिंह भाजपच्या वाटेवर असल्याची जोरदार चर्चा आहे. 

कृपाशंकर यांच्या घरी मुख्यमंत्री पोहचल्याने कॉंग्रेसच्या गोटात आश्‍चर्य व्यक्त केले जात नाही. याबाबत बोलण्यास ही कॉंग्रेस नेत्यांनी नकार दिला आहे. 

कृपाशंकर सिंह यांचे केंद्रीय मंत्री राजनाथ सिंह यांचे जवळचे संबध असल्याचे सांगितले जाते. 2014 मध्येच कृपाशंकर उत्तर प्रदेश मधून विधानसभा निवडणूक लढवणार होते मात्र ते शक्‍य झाले नाही. त्यांच्यामागच्या इडीच्या चौकशीचा ससेमिरा ही संपला आहे. त्यामुळे त्यांची वाट सुकर झाल्याचे मानले जाते. 

संबंधित लेख