कृष्णा कारखान्यात सव्वाशे कोटींचा गैरव्यवहार ! 

कृष्णा कारखान्यात सव्वाशे कोटींचा गैरव्यवहार ! 

इस्लामपूर (सांगली) :  यशवंतराव मोहिते कृष्णा साखर कारखान्याच्या सन 2010 ते 15 या कालावधीच्या लेखा परीक्षणात सुमारे सव्वाशे कोटी रुपयांचा गैरव्यवहार झाला असल्याचा आरोप कारखान्याचे माजी अध्यक्ष डॉ. इंद्रजित मोहिते यांनी आज येथे पत्रकार परिषदेत केला. या गैरव्यवहाराचा खुलासा त्यांनी करण्याची मागणी केली आहे. 

डॉ. मोहिते म्हणाले,"2016 मध्ये 168 क्रमांकाचा फौजदारी खटला, बॅंकेचे कर्ज, त्याच्या विनियोग गैरठिकाणी झाला आहे. त्यामुळे तोडणी व वाहतूक ठेकेदार अडकले आहेत. ही बाब न्यायप्रविष्ट असली तरी त्यामुळे कारखान्याचा नावलौकिक गमावला आहे. या प्रकरणातील 58 लाख 60 हजार रक्कम खरी आहे का? मिळालेल्या कर्जाचा वापर कोठे झाला ? कारखान्याच्या अध्यक्षांनी सभासदांना पारदर्शी कारभार दाखवण्यासाठी याचा खुलासा करावा. कलम 83, 88 व 85 अ अंतर्गत माजी संचालकांना नोटिसा आल्या. कागदपत्रे सादर करूनही चौकशी सुरू आहे. 2010-15 काळात वाहनांवर सात कोटी 37 लाख 51 हजार 789 रुपये खर्च झाला आहे. यातील खासगी वाहनांवर 4 कोटी 31 लाख 40 हजार 815 खर्च झाला आहे. नोकरीचा स्टाफिंग पॅटर्न निश्‍चित असताना कॉन्ट्रॅक्‍ट पद्धतीने नेमणुका केल्या आहेत. पूर्वपरवानगी, मुलाखती न घेता अनेकांना ऑर्डरी दिल्या आहेत. त्यामुळे 24 कोटी 48 लाखांचा तोटा झाला आहे. 2009 मध्ये आम्ही सहवीज प्रकल्पाची चाचणी घेतली. कारखान्याचे अत्याधुनीकरण व क्षमता वाढ कायद्याने होत असताना तज्ज्ञामार्फत प्रोजेक्‍ट रिपोर्ट देऊन कमी खर्चाची निविदा मान्य करून खरेदी केली जाते. मात्र इथे परस्पर खरेदी करून जादा पैसे दिल्याने 19 कोटी 89 लाखांचे नुकसान झाले आहे. ऊस न नोंदवता व त्याचे गाळप न करता 632.552 टनांचे ऊस बिल निघाले आहे. त्यात 17 लाख 64 हजारांचा तोटा झाला आहे. वाहतूकदारांच्या अपूर्ण तोडणीमुळे 9 कोटी 2 लाखांचे कर्ज सभासदांच्या पैशातून फेडले आहे. इरिगेशन स्कीम तोट्यात आहे. कृषी कॉलेज हे कारखान्याच्याच मालकीचे आहे. लोकांना फसवण्याचा उद्योग राजकारणातून झाला. कॉलेजच्या फी मध्ये 2 कोटी 21 लाख 67 हजारांचा अपहार झाला आहे. या सर्वांचा खुलासा होणे आवश्‍यक आहे.'' 
यावेळी माजी संचालक आनंदराव मलगुंडे, बबनराव सावंत, दिलीप मोरे, सुरेंद्र पाटील, धनपाल माळी उपस्थित होते. 
 

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com