आरक्षणाच्या मागणीसाठी उपसभापतींचा राजीनामा
बीड : मराठा आरक्षणाच्या मागणीसाठी रस्त्यावर उतरलेल्या आंदोलकांची संख्या वाढत असताना या मागणीसाठी अनेक मान्यवर आपल्या पदाचे राजीनामे देत आहेत. आता त्यात भरच पडत आहे. हे लोण स्थानिक स्वराज्य संस्थापर्यंत येऊन पोहोचले आहे.
माजलगाव पंचायत समितीचे राष्ट्रवादीचे उपसभापती सुशिल सोळंके यांनी आरक्षणाच्या मागणीसाठी आपल्या पदाचा राजीनामा दिला.