koyna water issue | Sarkarnama

कोयनेचे पाणी कर्नाटकला देण्यास आमदारांचा विरोध

सरकारनामा ब्युरो
शुक्रवार, 14 एप्रिल 2017

टंचाईच्या पार्श्‍वभूमीवर कोयना धरणातील अतिरिक्त अडीच टीएमसी पाणी कर्नाटकला सोडण्याचा निर्णय मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी घेतला आहे. याबाबत सातारा जिल्ह्यातील आमदारांना अंधारात ठेवले गेल्याने आमदारांनी या निर्णयाला विरोध दर्शविला आहे.
 

सातारा : टंचाईच्या पार्श्‍वभूमीवर कोयना धरणातील अतिरिक्त अडीच टीएमसी पाणी कर्नाटकला सोडण्याचा निर्णय मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी घेतला आहे. याबाबत सातारा जिल्ह्यातील आमदारांना अंधारात ठेवले गेल्याने आमदारांनी या निर्णयाला विरोध दर्शविला आहे.

पाणी सोडण्याच्या निर्णयामुळे कोयनेच्या बॅक वॉटरची पाणी पातळी आणखी खालावणार आहे. त्यामुळे महाबळेश्‍वर, जावली आणि पाटण तालुक्‍यातील बॅकवॉटरच्या कडेच्या गावांत पाणी टंचाई भासणार आहे. याचे सर्व्हेक्षण भूजल विभागाने करून त्याचा अहवाल नियोजन समितीच्या बैठकीत देण्याची सूचना सर्व आमदारांनी केली आहे. यासंदर्भात मुख्यमंत्री व राज्यातील भाजप सरकारने या निर्णयाचा फेरविचार करावा, अशी आग्रही मागणी आमदारांनी केली आहे. तर पालकमंत्र्यांनी याबाबत मुख्यमंत्र्यांपर्यंत जिल्ह्यातील आमदारांच्या भावना पोचवाव्यात अशी अपेक्षाही टंचाई आढावा बैठकीत व्यक्त केली आहे.

संबंधित लेख