kotkar family and shivsena | Sarkarnama

हर्षवर्धन कोतकर कॉंग्रेसमध्ये परतणार की शिवसेनेवरची निष्ठा पाळणार

सरकारनामा ब्युरो
शनिवार, 17 नोव्हेंबर 2018

नगर : केडगावमधील कोतकर कुटुंबियांमधील हर्षवर्धन कोतकर याने मागील वर्षी शिवसेनेत प्रवेश केला होता. पण आता उमेदवारी मिळण्याची चिन्हे दिसत नसल्याने पुन्हा स्वगृही कॉंग्रेसमध्ये परतण्याचा प्रयत्न सुरू केला आहे. कोतकर कुटुंबिय मुळचे कॉंग्रेसचेच. कुटुंबांतल्या सगळ्यांची नुकतीच एक बैठक होवून आपले राजकीय अस्तित्त्व टिकवून ठेवायचे, असा ठाम निर्णय झाला. कॉंग्रेस सोडून शिवसेनेत गेलेल्या हर्षवर्धनला परत आणायचे, असा बहुतेकांनी व्यक्त केलेला मानस हर्षवर्धनला पुन्हा मायघरी आणू शकतो.

नगर : केडगावमधील कोतकर कुटुंबियांमधील हर्षवर्धन कोतकर याने मागील वर्षी शिवसेनेत प्रवेश केला होता. पण आता उमेदवारी मिळण्याची चिन्हे दिसत नसल्याने पुन्हा स्वगृही कॉंग्रेसमध्ये परतण्याचा प्रयत्न सुरू केला आहे. कोतकर कुटुंबिय मुळचे कॉंग्रेसचेच. कुटुंबांतल्या सगळ्यांची नुकतीच एक बैठक होवून आपले राजकीय अस्तित्त्व टिकवून ठेवायचे, असा ठाम निर्णय झाला. कॉंग्रेस सोडून शिवसेनेत गेलेल्या हर्षवर्धनला परत आणायचे, असा बहुतेकांनी व्यक्त केलेला मानस हर्षवर्धनला पुन्हा मायघरी आणू शकतो. त्यामुळे कोतकर भाऊबंदांसाठी कॉंग्रेसमध्ये परतणार की शिवसेनेने उमेदवारी दिल्यास पक्षनिष्ठा पाळणार, याकडे अनेकांचे लक्ष आहे. 

नगर जिल्ह्याला कोतकर कुटुंबिय सर्वपरिचित आहे. मुळ केडगावचेच असल्याने केडगाववर त्यांचा राजकीय अंमल वर्षानुवर्ष आहे. साहजिकच तेथील उमेदवारी कोतकर कुटुंबियांच्या बाहेर कधीच गेली नाही. उमेदवारही कायम याच कुटुंबातील राहिला. असे असताना मध्यंतरी झालेल्या काही स्थित्यंतरांमुळे युवकांची नवीन फळी बाहेर पडण्याच्या मनःस्थितीत होती. त्याचाच भाग म्हणून हर्षवर्धन कोतकर हा तरुण मागील वर्षी शिवसेनेत दाखल झाला. पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या उपस्थितीत त्याचा प्रवेश झाला. आता या भगव्याखाली येवू इच्छिणाऱ्या भाऊबंदांना कॉंग्रेसच्या पंजाची नाळ तुटेना. शिवसेनेशी कट्टर दुष्मनी असल्याने त्यांच्याच कळपात जाणे जुन्या लोकांना रुचेना. त्यामुळे नुकतीच अंबाबाईच्या मंदिराजवळ कोतकर कुटुंबियांची बैठक झाली. केडगाववर आपला यापूर्वीपासून असलेला अंमल कायम ठेवायला हवा. कोतकर यांच्यामुळे केडगाव ओळखले जाते. ही ओळख पुसली, तर उपयोग राहणार नाही, याच उद्देशाने आपला उमेदवार देऊन एकदिलाने निवडून आणण्याचे ठरले. 

अर्थात केवळ हर्षवर्धनसाठी सर्व भाऊबंद शिवसेनेत कसे येतील. वर्षानुवर्ष घरात लागलेले कॉंग्रेसजणांचे फोटो कसे निघतील. असे अनेक प्रश्न निर्माण झाले आहेत. त्यासाठीच आता हर्षवर्धननेच स्वगृही यावे, असा विचार पुढे येवू लागला आहे. हर्षवर्धनलाही शिवसेनेच्या पहिल्या दोन यादीत उमेदवारी मिळालेली नाही. तिसऱ्या यादीत भरवसा नाही, त्यामुळे तेथेही त्याला असुरक्षितता वाटू लागली आहे. साहजिकच पुन्हा स्वगृही परतण्याचे डोहाळे लागले आहेत. त्याने तसा निर्णययही घेतला आहे. 
दरम्यान, शिवसेनेने उमेदवारी दिली तरीही हर्षवर्धन थांबण्याच्या मनस्थितीत राहणार नाही. भाऊबंदांचा विरोध पत्कारून मतदानाचा फटका सहन करणार नाही, त्यामुळे शिवसेनेचे नेते हर्षवर्धनला कॉंग्रेसमध्ये स्वगृही जावू देतात, की त्याचे मन वळविण्यासाठी प्रयत्न करतात, याकडे अनेकांचे लक्ष आहे. 

संबंधित लेख