koregaon bhima and good condition in city | Sarkarnama

कोरेगाव भीमामध्ये विजयस्तंभ परिसरात एकीचा सूर...

अमोल कविटकर
मंगळवार, 1 जानेवारी 2019

कोरेगाव-भीमा : विजयस्तंभ परिसरातील मागील वर्षीच्या कटू आठवणी मागे सारत यंदा पुन्हा एकदा एकीचा सूर पाहायला मिळाला. विजयस्तंभाला अभिवादन करण्यासाठी आलेल्या भीमसैनिकांचे गावकऱ्यांकडून गुलाब पुष्प आणि पिण्याचे पाणी देऊन स्वागत केले गेले. गावकऱ्यांकडून होत असलेल्या स्वागताने भीमसैनिकही भारावून जात होते. "झाले गेले गंगेला मिळाले', हीच भावना स्पष्टपणे दिसत होती. 

मागील वर्षी झालेला दंगलीमुळे यंदा दोन-अडीच महिने आधीपासूनच प्रशासन, पोलीस आणि ग्रामस्थांनी एकमेकांना विश्वासात घेऊन तयारी सुरू केली होती. विशेषतः पेरणेमधील गावकऱ्यांनी आणि परिसरातील गावांनी विशेष तयारी केलेली पाहायला मिळाली. या संदर्भात विजय स्तंभ असलेल्या पेरणे गावचे सरपंच रुपेश ठोंबरे, "सरकारनामा' शी बोलताना म्हणाले, " सोमवारपासूनच भीमसैनिक विजय स्तंभ परिसरात यायला सुरुवात झाली होती. तेव्हापासूनच आम्ही गावकरी गुलाबपुष्प आणि पाणी देऊन त्यांचे स्वागत करत आहोत. कोणत्याही भीसैनिकाच्या मनात कोणतीही भीती नाही आणि शंकाही नाही. आमचे स्वागत आनंदाने स्वीकारले जात होते' 

कराडहून आलेले प्रा. डॉ. ए. जी. ओव्हळ म्हणाले, " वाईट विचार करून जे समाजकंटक द्वेषाची पेरणी करत होते, ते या कृतीमुळे नक्कीच बदलतील. सलोख्याचे वातावरण राखण्यासाठी सर्वच जण कटीबद्ध आहोत. डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी सांगितलेला सलोख्याचा विचार आम्ही एकत्रितपणे पुढे नेत आहोत". 
 
संबंधित लेख