konkan commissioner on leave mumbai munciple news | Sarkarnama

कोकण आयुक्तांची रजा, मुंबई भाजपची मजा 

सरकारनामा ब्युरो 
मंगळवार, 17 ऑक्टोबर 2017

मुंबई : मुंबई महापालिकेत भाजपचा महापौर होण्याचे स्वप्न भंगल्यानंतर शिवसेनेची बाजू भक्कम होऊ नये यासाठी भाजपकडून प्रयत्न केले जात असताना कोकण आयुक्त जगदीश पाटील हे रजेवर असल्याचे समजताच भाजपच्या गोटात खुशीचे वातावरण आहे. 

मुंबई : मुंबई महापालिकेत भाजपचा महापौर होण्याचे स्वप्न भंगल्यानंतर शिवसेनेची बाजू भक्कम होऊ नये यासाठी भाजपकडून प्रयत्न केले जात असताना कोकण आयुक्त जगदीश पाटील हे रजेवर असल्याचे समजताच भाजपच्या गोटात खुशीचे वातावरण आहे. 

मुंबई महापालिकेत अडचणीत आलेल्या सत्ताधारी शिवसेनेत मनसेच्या सहा नगरसेवकांनी प्रवेश केल्याने सेनेची कॉलर टाईट झाली आहे. शिवसेनेची नगरसेवक संख्या आता 90 झाली असून सेनेला तीन अपक्षांचा पाठींबा असल्याने सेनेचे एकूण संख्याबळ 93 झाले आहे. या नगरसेवकांच्या समर्थनाचे एक पत्र शिवसेनेतर्फे कोंकण आयुक्तांना देण्यात आले. मात्र सेनेला त्रास व्हावा यासाठी त्या सहा मनसेच्या नगरसेवकाना सेनेत त्वरित सामावून घेऊ नये किंवा त्याना वेगळा गट स्थापण्याची परवानगी लवकर मिळू नये यासाठी भाजपने वरिष्ठ पातळीवरून दबाव आणण्याचा प्रयत्न केला. त्यात संदर्भात निर्णय देणारे कोकण आयुक्त हे रजेवर असल्याने निर्णय प्रक्रियेला उशीर होणार आहे. त्यामुळे शिवसेनेची डोकेदुखी वाढणार आहे. 

दरम्यान, शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या उपस्थितीत दादर येथील महापौर बंगल्यावर सेनेच्या सर्व नगरसेवकांची बैठक सोमवारी रात्री उशिरा पर्यंत पार पडली. यावेळी, मनसेमधून सेनेत प्रवेश केलेले सहा नगरसेवकही उपस्थित होते, असे सूत्रांकडून समजते. शिवसेनेला प्रत्येक वेळी डिवचणाऱ्या पहारेकारी भाजपला कशा प्रकारे सडेतोड उत्तरे देऊन कसे रोखता येईल, याबाबतही रणनीती ठरविण्यात आल्याचे समजते. 

संबंधित लेख