शेतकऱ्यांपाठोपाठ आता  कोळ्यांचाही एल्गार ? 

शेतकऱ्यांपाठोपाठ आता  कोळ्यांचाही एल्गार ? 

मुंबई : शेतकऱ्यांच्या कर्जमाफी प्रकरणाने राज्य सरकार कोंडीत सापडलेले असतानाच मुंबई शहर, उपनगर, नवी मुंबई, ठाणे, पनवेल, उरण, भाईदर आदी भागातील कोळी लोकांनीही राज्य सरकारविरोधात आंदोलन करण्याची तयारी सुरु केली आहे. वर्षानुवर्षे कोळी समाजाची उपेक्षाच होत असल्याने आता अखेरची निर्णायक लढाई लढण्याची भाषा कोळी समाजाच्या युवा पिढीकडून बोलली जात आहे. 

मुंबई शहर, उपनगर, ठाणे-भाईदर, नवी मुंबई-पनवेल-उरण भागात नागरीकरण झाले असले तरी त्या त्या भागात असणारे कोळीवाडे आजही कोळी समाजाचे अस्तित्व दाखवून देत आहे. सागरात, खाडीमध्ये होत असलेली विकासकामे आणि अतिक्रमणामुळे मासे कमी होत असल्याने कोळी लोकांच्या अस्तित्वावर आणि उपजिविकेवर प्रश्‍नचिन्ह निर्माण होवू लागले आहे. मुंबईतील सागरात शिवस्मारकावरून मासेमारीवर परिणाम होणार असल्याने येथील कोळी संघटीत होवून लढा देत आहेत. भाईदर-ठाणे, नवी मुंबई-पनवेल-उरण भागात वाढत्या विकसिकरणामुळे तेथील खाड्या दूषित झाल्या आहेत. त्यातच खाड्यामध्ये उभारल्या जाणाऱ्या पुलामुळे, खाडीकिनाऱ्यालगतच्या रस्त्यामुळे खाडीतील मासेमारी संपुष्ठात आली असल्याचे कोळी समाजाकडून सांगण्यात येत आहे. 

नवी मुंबईत उभारल्या गेलेल्या खाडीपुलामुळे, रेल्वे पुलामुळे, पामबीच मार्गामुळे तसेच कंपनी-कारखान्यातील रासायनिक प्रदूषित पाण्यामुळे येथील मासेमारीवर टक्के परिणाम झाला आहे. भाईदर भागातही खाडीत रेल्वे पुल व अन्य वाहतुकीचे पुल बांधल्याने कोळी लोकांच्या नव्या पिेढीला आता नाक्‍यावर रोजगार शोधण्याची वेळ आली आहे. 
पनवेल परिसरात होत असलेल्या आंतरराष्ट्रीय विमानतळामुळेही तेथील कोळी लोकांसमोर उपजिविकेचे संकट निर्माण झाले आहे. त्यामुळे आता सर्वच भागातील कोळी समाज एकत्रित येवून राज्य सरकारच्या विरोधात लढ्याची तयारी करत आहे. 

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com