Kolhapuru Chapplas to get International Market | Sarkarnama

कोल्हापुरी चप्पलला आंतरराष्ट्रीय बाजारपेठ मिळवून देणार - चोरडिया

संजीव भागवत
शनिवार, 29 एप्रिल 2017

महाराष्ट्र राज्य खादी व ग्रामोद्दोग मंडळ हे राज्यातील ग्रामीण भागातील पारंपरिक बलुतेदार, आणि त्याअनुषंगाने 120 ग्रामीण उधोगासाठी कार्यरत आहे. मंडळाकडून अनेक योजना राबविल्या जातात असुन कारागिरांच्या कौशल्यवृध्दी आणि व्यवसाय वाढ करणे, त्यांना बाजारपेठ उपलब्ध करून देणे याशिवाय इतर विकासाचे कार्यक्रम ही राबवले जात आहेत - विशाल चोरडिया

मुंबई - देशात चर्मोद्योगाच्या क्षेत्रात कायम आपला दबदबा असलेल्या कोल्हापुरी चप्पलांना आंतरराष्ट्रीय बाजारपेठ मिळवून देण्यात येणार असल्याची माहिती महाराष्ट्र राज्य खादी व ग्रामोद्दोग मंडळाचे सभापती विशाल चोरडिया यांनी मुंबईत दिली.

कोल्हापूरी चपलांच्या ब्रँडला देशात मोठी बाजारपेठ आहे. मात्र, या चपला तयार करणाऱ्या कारागिरांना योग्य कौशल्य, रोजगार आणि बाजारपेठेचे प्रशिक्षण नसल्याने या ब्रॅंडला योग्य किंमत मिळत नव्हती, यामुळेच आता आम्ही राज्यातील या कारागिरांची 5 मे रोजी राज्यात पहिल्यांदाच कार्यशाळा घेत आहोत. ही कार्यशाळा छत्रपती शाहु स्मारक सभागृह, कोल्हापूर, येथे सकाळी 10 ते 5.30 या वेळात होणार आहे. या कार्यशाळेत सुमारे 700 हुन अधिक ग्रामीण कारागीर सहभागी होतील अशी माहितीही चोरडिया यांनी दिली.

कोल्हापूर जिल्ह्यात शेकडो कारागीर हा व्यवसाय करत असून ते पारंपरिक पद्धतीने हे ही चप्पल बनवत आहेत. त्यांना जागतिकीकरणाच्या स्पर्धेत टिकून राहण्यासाठी अनेक बदल करणे आवश्यक आहे, कोल्हापूरी चप्पलेला ग्लोबल करण्यासाठी व त्यांची कला टिकवून ठेवण्यासाठी त्यांना वेगवेगळे प्रशिक्षण देणे आवश्यक आहे त्यामुळे 5 मे रोजी होत असलेली कोल्हापूर चप्पल कारागिरांची कार्यशाळा महत्वाची ठरेल असा विश्वासही चोरडिया यांनी व्यक्त केला. यावेळी मंडळाच्या कार्यकारी अधिकारी ऋचा बागल, उपकार्यकारी अधिकारी विपिन जगताप आदी अधिकारी उपस्थित होते.

 

संबंधित लेख