Kolhapur : Those 19 corporators get breather | Sarkarnama

कोल्हापूरात 'त्या' 19 नगरसेवकांचा जीव भांड्यात पडला !

सुनील पाटील 
मंगळवार, 18 सप्टेंबर 2018

सत्ताधारी कॉंग्रेसचे 7 व राष्ट्रवादीचे 4, शिवसेनेचा 1 आणि विरोधी भाजपचे 4 व ताराराणी आघाडीचे 3 नगरसेवकांना पद सोडावे लागणार होते.

कोल्हापूर : महापालिका व ग्रामपंचायतींमध्ये राखीव जागांवर निवडणूक लढविण्यासाठी इच्छुकांना जात वैधता प्रमाणपत्र सादर करण्यासाठी देण्यात आलेली सहा महिन्याची मुदत एक वर्ष केली आहे. त्यामुळे, सहा महिन्यात जात वैधता प्रमाणपत्र न दिल्यामुळे कोल्हापूर महापालिकेतील पद रद्द झालेली 19 नगरसेवकांना दिलासा मिळाला आहे. 

निवडणूक आयोगाने 16 डिसेंबर 2016 ला निवडूण आल्यानंतर सहामहिन्यात जात वैधता प्रमाणपत्र देण्याचे आदेश दिले होते. मात्र, याकडे दुर्लक्ष करत सत्ता भोगणाऱ्या आणि जात वैधता प्रमाणपत्र न देणाऱ्या नगरसेवकांची पद रद्द करण्याचे आदेश न्यायालयाने दिल्यांनतर नगरसेवकांची झोप उडाली होती.

त्यानूसार राज्य सरकारच्या पातळीवर हा प्रश्‍न निकालात काढण्याचे काम केले जात होते. दरम्यान, आज यावर निर्णय झाल्याने कोल्हापूर महापालिकेतील 19 नगरसेवकांना दिलासा मिळाला आहे.

कोल्हापूर महापालिकेत कॉंग्रेस-राष्ट्रवादीची सत्ता आहे. सत्ताधारी कॉंग्रेसचे 7 व राष्ट्रवादीचे 4, शिवसेनेचा 1 आणि विरोधी भाजपचे 4 व ताराराणी आघाडीचे 3 नगरसेवकांना पद सोडावे लागणार होते. आता या नगरसेवकांना जात वैधता प्रमाणपत्र सादर करण्यासाठी सहा महिन्याचा कालावधी मिळला आहे. 
 

यांना नगरसेवकांना मिळाला दिलासा 
कॉंग्रेस - सौ. अश्‍विनी रामाणे, सौ. स्वाती यवलुजे, डॉ. संदीप नेजदार, सौ. वृषाली कदम, सुभाष बुचडे, श्रीमती दीपा मगदूम, सौ. रिना कांबळे. 
राष्ट्रवादी - सौ. हसिना फरास, सचिन पाटील, अफजल पिरजादे, सौ. शमा मुल्ला. 
भाजप - सौ. अश्‍विनी बारामते, विजय खाडे, संतोष गायकवाड, मनीषा कुंभार. 
ताराराणी - किरण शिराळे, कमलाकर भोपळे, सौ. सविता घोरपडे. 
शिवसेना - नियाज खान.  

संबंधित लेख