kolhapur sp abhinav deshmukh about maratha reservation | Sarkarnama

#MarathaReservation आरक्षण मिळाल्यानंतर आम्हीसुद्धा लाभार्थी : SP अभिनव देशमुख 

सरकारनामा ब्युरो
मंगळवार, 7 ऑगस्ट 2018

मराठा आरक्षण मिळाल्यानंतर त्याचे आम्हीसुद्धा लाभार्थी असणार आहोत. आता फक्त गावातील तरुणांना शांत करा. आंदोलनाचा "ऍक्‍शन प्लॅन' तयार करा.-

IPS अभिनव देशमुख

कोल्हापूर :"कोल्हापूरवर अन्य जिल्ह्यांपेक्षा अधिक जबाबदारी आहे. आंदोलनाला गालबोट न लागता त्याचा शेवट गोड व्हावा, अशी आमची इच्छा आहे. मराठा आरक्षण मिळाल्यानंतर त्याचे आम्हीसुद्धा लाभार्थी असणार आहोत. आता फक्त गावातील तरुणांना शांत करा. आंदोलनाचा "ऍक्‍शन प्लॅन' तयार करा'', असे आवाहन पोलिस अधीक्षक अभिनव देशमुख यांनी केले. 

मुस्लिम बोर्डिंगमध्ये आयोजित सकल मराठा समाजाचे प्रतिनिधी व पोलिस प्रशासनाच्या बैठकीत ते बोलत होते. 

वसंत मुळीक म्हणाले, "सरकारवर दबावासाठीचे आमचे आंदोलन आहे. सर्व तालुक्‍यातील मराठा बांधवांशी आमचा संपर्क आहे. आमचा लढा आमच्या भावी पिढ्यांच्या भवितव्यासाठी आहे.'' कणेरीवाडीतील विनायक गुदगी याने केलेली आत्महत्या मराठा आरक्षणासाठीच आहे, असेच माझे मत आहे, असेही ते म्हणाले. 

प्रा. जयंत पाटील यांनी बंद मागे घेतला तर समाजाच्या प्रतिनिधींची घरे उद्‌ध्वस्त होतील, असे स्पष्ट केले. हर्षल सुर्वे म्हणाले, "ठोक मोर्चाचा अर्थ सरकारविरोधात घणाघाती भाषण किंवा सरकारवर दबाव आणणे असा आहे. ठोकाठोकी अथवा फोडाफोडी नव्हे.'' 

या वेळी माजी आमदार सुरेश साळोखे, फत्तेसिंह सावंत, स्वप्नील पार्टे, जयेश कदम यांनी सूचना केल्या. 

अधिक राजकीय बातम्यांसाठी सरकारनामा अॅप डाऊनलोड करा
Play Store    App Store

संबंधित लेख