kolhapur shetty khot crisis | Sarkarnama

सरकारनेच यांचा 'शेवट' केलाय? 

निवास चौगले 
सोमवार, 26 फेब्रुवारी 2018

कृषीराज्य मंत्री सदाभाऊ खोत व स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे खासदार राजू शेट्टी यांच्या वादामागे वर्चस्ववाद हे मुख्य कारण आहे. प्रभाव क्षेत्रात आपली ताकद किती हेही दाखवण्याचा प्रयत्न या दोघांकडून सुरू असून या वादाला कालच्या घटनेने जातीचीही किनार मिळाल्याचे श्री. खोत यांचे पुत्र सागर यांनी फेसबुकवर टाकलेल्या एका "पोस्ट' मुळे स्पष्ट झाले आहे. 

कोल्हापूर : कृषी राज्यमंत्री सदाभाऊ खोत व स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे खासदार राजू शेट्टी यांच्या वादामागे वर्चस्ववाद हे मुख्य कारण आहे. प्रभाव क्षेत्रात आपली ताकद किती हेही दाखवण्याचा प्रयत्न या दोघांकडून सुरू असून या वादाला कालच्या घटनेने जातीचीही किनार मिळाल्याचे श्री. खोत यांचे पुत्र सागर यांनी फेसबुकवर टाकलेल्या एका "पोस्ट' मुळे स्पष्ट झाले आहे. 

एखाद्या संघटनेत फूट पाडल्याशिवाय त्यांची ताकद कमी करता येत नाही हे सरकारनेही ओळखले. त्यातून या दोघांत भांडण लावण्यात सरकारही यशस्वी झाले. श्री. खोत यांच्या रूपाने एक शेतकरी नेता आपल्याला मिळाला तर श्री. शेट्टी यांना शह देण्याचाही यातून सरकारचा प्रयत्न यशस्वी झाला. 

माढ्यातील वादानंतर श्री. खोत यांचे पुत्र सागर यांनी फेसबूकवर "सुरूवात शेट्टींनी केली, आम्ही त्याचा शेवट करू-एक मराठा लाख मराठा' अशी पोस्ट करून या वादाला जातीय रंग असल्याचे स्पष्ट केले. तसे गेल्या विधानसभा निवडणुकीतच या वादाची झलक शिरोळ मतदार संघात पहायला मिळाली होती. संघटनेचे त्यावेळचे शिलेदार असलेल्या उल्हास पाटील यांना डावलून सावकर मादनाईक यांना संघटनेने उमेदवारी दिल्यानंतर काय घडले आणि श्री. पाटील यांचा विजय कसा झाला हा सगळा इतिहात तपासला तर त्यातून सर्व गोष्टी स्पष्ट होतील. वर्षभरात लोकसभेच्या आणि विधानसभेच्याही निवडणुका लागण्याची शक्‍यता आहे. त्यामुळे शेतकरी प्रती असलेले आपले प्रेम वक्त करण्यासाठी हा वर्चस्ववाद सुरू आहे. 

संबंधित लेख