शौमिका महाडीकांच्या आदेशान गाडीची हवा सोडल्याने वादावादी; ZP माजी उपाध्यक्षांचा दंगा! 

जिल्हा परिषदेच्या आवारात नो-पार्किंगमध्ये उभा केलेल्या माजी उपाध्यक्ष शशिकांत खोत यांच्या चारचाकी गाडीची हवा जिल्हा परिषद अध्यक्ष शौमिका महाडिक यांच्या आदेशाने सोडण्यात आली. या घटनेने जिल्हा परिषद आवारात तणावाचे वातावरण निर्माण झाले. नेहमी ही गाडी याच ठिकाणी लावली जात असल्याने आपण हे आदेश दिल्याचे सौ. महाडीक यांनी सांगितले. या प्रकरणावरून कोल्हापूर दक्षिण विधानसभा मतदार संघातील राजकारण उफाळून आले.
शौमिका महाडीकांच्या आदेशान गाडीची हवा सोडल्याने वादावादी; ZP माजी उपाध्यक्षांचा दंगा! 

कोल्हापूर : जिल्हा परिषदेच्या आवारात नो-पार्किंगमध्ये उभा केलेल्या माजी उपाध्यक्ष शशिकांत खोत यांच्या चारचाकी गाडीची हवा जिल्हा परिषद अध्यक्ष शौमिका महाडिक यांच्या आदेशाने सोडण्यात आली. या घटनेने जिल्हा परिषद आवारात तणावाचे वातावरण निर्माण झाले. नेहमी ही गाडी याच ठिकाणी लावली जात असल्याने आपण हे आदेश दिल्याचे सौ. महाडीक यांनी सांगितले. या प्रकरणावरून कोल्हापूर दक्षिण विधानसभा मतदार संघातील राजकारण उफाळून आले. 

जिल्हा परिषदेच्या पोर्चमध्ये तसेच समोरच्या बाजुला पुर्वी वाहने पार्किंग करण्यात येत होती. साधारण वर्षापुर्वी जिल्हा परिषदेसमोरील जागा मोकळी राहवी तसेच कागलकर वाड्याजवळील जागा उपयोगात यावी म्हणून जिल्हा परिषद प्रशासनाने जिल्हा परिषदेसमोरचा परिसर "नो पार्किंग' केला. हा निर्णय झाल्यानंतर सुरक्षा रक्षकांनी प्रवेशद्वारातच वाहने अडविण्यास सुरुवात झाली. रस्त्यावरच वाहने थांबविण्यात येऊ लागल्यामुळे पदाधिकाऱ्यांना प्रवेशद्वारापासून चालत जिल्हा परिषदेत यावे लागले.

ही बाब काही पदाधिकाऱ्यांना खटकली त्यांनी त्यात नियमात बदल केला. पदाधिकारी व सदस्यांची वाहने आत येतील व त्यांना सोडून परत पार्किंगच्या जागेत जातील, असा नियमात बदल करण्यात आला. मात्र काही पदाधिकारी आणि सदस्य तेथेच वाहन लावण्याचा प्रयत्न करत असत, मात्र सुरक्षा रक्षक कागलकर वाड्याजवळ लावण्याच्या सूचना देत होते.

याचा काही पदाधिकारी, सदस्य किंवा त्यांच्या चालकांना राग यायचा यातून सुरक्षा रक्षक आणि त्यांच्यामध्ये वादावादी होत असत. ही वादावादी नित्याचीच झाल्याने काहीवेळा सुरक्षा रक्षक दुर्लक्ष करण्याचा प्रयत्न करत असत, मात्र वाहनांची संख्या अधिक होऊ लागली की त्यानां सर्वांनाच तेथून हटवत असत. 

जिल्हा परिषद अध्यक्ष शौमिका महाडिक या स्वत: आपले वाहन पोर्चमध्ये कधी पार्किंग करत नाहीत. वाहनातून उतरल्या की ते चालकाला गाडी बाहेर पार्किंग करण्याच्या सुचना देत. शशिकांत खोत यांच्या पत्नी जिल्हा परिषद सदस्य आहेत. जिल्हा परिषदेत होणाऱ्या बैठकांसाठी किंवा काही कामानिमित्त त्या जिल्हा परिषदेत 1008 क्रमांकाच्या वाहनातून येतात. त्यांना सोडून हे वाहन बाहेर न जाता त्याच ठिकाणी पार्क करण्यात येत असत. जिल्हा परिषदेच्या प्रवेशद्वारात नो पार्किंग असताना 1008 क्रमांकाची गाडी नेहमी पार्किंग केलेली दिसायची.

आज देखील खोत यांची 1008 क्रमांकाची गाडी प्रवेशद्वारात उभा असलेली अध्यक्ष सौ. महाडिक यांना दिसली. त्यांनी या गाडीबाबत सुरक्षा रक्षकाकडे चौकशी केली असता सुरक्षा रक्षकांनी आम्ही त्यांना वारंवार सांगतो मात्र ते आम्हालाच शिविगाळ करत असल्याची तक्रार केली. त्यामुळे संतप्त झालेल्या सौ. महाडिक यांनी वाहनातील हवा सोडण्याचे आदेश दिले. त्याप्रमाणे खोत यांच्या गाडीची हवा सोडण्यात आली.

हे खोत यांना समजल्यानंतर ते गाडीजवळ अक्षरश: दंगा करतच आले. तेंव्हा अध्यक्ष सौ. महाडिक व त्यांच्यात वादा सुरू झाल्याने पोर्चमध्ये अधिकारी, कर्मचारी जमा झाले. मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. कुणाल खेमनार तसेच अन्य अधिकारीही त्याठिकाणी आले. अध्यक्ष सौ. महाडिक यांनी नियम सर्वांना सारखाच असतो. त्यामुळे सुरक्षा रक्षकाची कारवाई योग्यच असल्याचे सांगून त्या निघून गेल्या. 
 

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com