केतकीच्या एक कप काॅफीने पोलिसांवरचा ताण निवळला

कोरेगांव भीमा येथील घटनेनंतर हातात दगड घेऊन निघालेल्या लहान मुलाचा व्हीडीओ सोशल मिडीयावर व्हायरल झाला. जात माहित नसलेल्या वयात हा लहान मुलगा जात संपवण्याची भाषा बोलत होता. त्याच वयातील एक चिमुरडी मात्र कोल्हापुरात रात्री बंदोबस्तावर असलेल्या पोलिसांना घरातून कॉफी आणून देत होती.
केतकीच्या एक कप काॅफीने पोलिसांवरचा ताण निवळला

कोल्हापूर : वेळ गुरूवारी (ता. 4) रात्रीची साडेदहाची. आमदार राजेश क्षीरसागर यांच्या घरासमोर मोठा पोलीस बंदोबस्त. त्याचवेळी एका ट्रेमध्ये कॉफी भरलेले कप घेऊन एक चिमुरडी पोलिसांच्या दिशेने येते, हातातील कप देत 'पोलीस काका घ्या कॉफी...' असे म्हणत खाकी वर्दीतील पोलिसांना एक सुखद धक्का देऊन जाते. शनिवार पेठेतील कागले कुटुंबातील केतकी कागले हिने घरात आईच्या मागे लागून कॉफी करून घेतली व ती बंदोबस्तावर असलेल्या पोलिसांना देऊन एक वेगळा आदर्श निर्माण केला.

कोरेगाव भीमा (जि. पुणे) येथे 1 जानेवारी रोजी घडलेल्या घटनेनंतर राज्यभर दंगलीचे लोण पसरले. कोल्हापुरात बुधवारी दलित संघटनांनी पुकारलेल्या बंदला हिंसक वळण लागले. त्याचे तीव्र पडसाद शहरात उमटले. अनेक दुकानांची, वाहनांची तोडफोड करण्यात आली. या आंदोलनाला रस्त्यावर उतरलेल्या हिंदुत्त्ववाद्यांनीही प्रत्युत्तर दिले. त्यामुळे शहरातील तणावात आणखीनच भर पडली.

कोरेगांव भीमा येथील घटनेनंतर हातात दगड घेऊन निघालेल्या लहान मुलाचा व्हीडीओ सोशल मिडीयावर व्हायरल झाला. जात माहित नसलेल्या वयात हा लहान मुलगा जात संपवण्याची भाषा बोलत होता. त्याच वयातील एक चिमुरडी मात्र कोल्हापुरात रात्री बंदोबस्तावर असलेल्या पोलिसांना घरातून कॉफी आणून देत होती.

कोल्हापुरात घडलेल्या घटनेच्या पार्श्‍वभुमीवर आमदार राजेश क्षीरसागर यांच्या घरासमोर मोठा पोलिस बंदोबस्त तैनात करण्यात आला होता. दिवसभर हे पोलीस याठिकाणी तळ ठोकून होते. दुकाने, चहागाड्या बंद असल्याने त्यंचीही गैरसोय झाली होती. त्याचवेळी बालवाडीत शिकणारी व याच परिसरात रहाणारी केतकी या पोलिसांसाठी घरातून कॉफी करून आणून देत होती. विशेष म्हणजे या चिमुरडीने आईकडे हट्ट धरुन तिला कॉफी बनवण्यास तिला भाग पाडले. केतकीचे वडील एचडीएफसी बॅंकेत व्यवस्थापक आहेत.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com