चंद्रकांतदादांनी 500 कोटी आणावेत, त्यांची हत्तीवरुन मिरवणूक काढेन : सतेज पाटील 

राज्यात आणि देशात भाजपची एकहाती सत्ता असतानाही कोल्हापूर शहराच्या विकासासाठी अपेक्षित निधी आलेला नाही. ड्रेनेजलाईनची अनेक कामे शहरात करायची आहेत. शाहू मिल येथे आंतरराष्ट्रीय स्मारक, तीर्थक्षेत्र आराखडा अशी अनेक कामे प्रलंबित आहेत. या सर्व कामासाठी पालकमंत्री चंद्रकांतदादा पाटील यांनी पाचशे कोटीचा निधी आणावा, मी त्यांची हत्तीवरून मिरवणूक काढेन, असे आव्हान आमदार सतेज पाटील यांनी पालकमंत्री पाटील यांना दिले.
चंद्रकांतदादांनी 500 कोटी आणावेत, त्यांची हत्तीवरुन मिरवणूक काढेन : सतेज पाटील 

कोल्हापूर : राज्यात आणि देशात भाजपची एकहाती सत्ता असतानाही कोल्हापूर शहराच्या विकासासाठी अपेक्षित निधी आलेला नाही. ड्रेनेजलाईनची अनेक कामे शहरात करायची आहेत. शाहू मिल येथे आंतरराष्ट्रीय स्मारक, तीर्थक्षेत्र आराखडा अशी अनेक कामे प्रलंबित आहेत. या सर्व कामासाठी पालकमंत्री चंद्रकांतदादा पाटील यांनी पाचशे कोटीचा निधी आणावा, मी त्यांची हत्तीवरून मिरवणूक काढेन, असे आव्हान आमदार सतेज पाटील यांनी पालकमंत्री पाटील यांना दिले. 

दरम्यान, पालकमंत्री पाटील यांनी कितीही धमक्‍या दिल्या तरी त्याला घाबरणार नाही. जिल्ह्यात दबावाचे राजकारण सुरू आहे. आयुक्तही दबाव टाकला की ऐकतात, हे आठवड्याभरात पाहिले आहे. त्यामुळे महापालिका आणि आयुक्‍त दरबारी प्रलंबित कामे वेळप्रसंगी दबाव टाकून करून घ्या, असेही श्री. पाटील म्हणाले. 

टिंबर मार्केट येथे मॉडेल रस्ता उद्‌घाटनप्रसंगी दिला. अध्यक्षस्थानी महापौर स्वाती यवलुजे होत्या. प्रभाग 57 नाथागोळे तालीम प्रभागातील लाड चौकात मॉडेल रस्ता उद्‌घाटनप्रसंगी ते बोलत होते. 

सतेज पाटील म्हणाले, "सत्ताधारी भाजपकडून शहराच्या विकासासाठी निधी तर मिळालेलाच नाही; याउलट आमचे दोन नगरसेवक पळवून नेऊन पुन्हा घोडेबाजार त्यांनी सुरू केला आहे. ज्यांचा इतिहासच घोडेबाजाराचा आहे, त्यांनीच हे काम केले आहे. घोडेबाजार नको म्हणून आम्ही महापालिकेत पक्षीय राजकारण सुरू केले. सत्ता कोणाची येऊ दे; पण ती पक्षाची असू दे म्हणून हे पक्षीय राजकारण आणले. पण हे देखील काही जणांना बघवलेले नाही. आमची सत्ता असताना आम्ही 1300 कोटींचा निधी आणला; पण आता या सरकारने निधी दिलेला नाही. शाहू मिल आंतरराष्ट्रीय स्मारक, महालक्ष्मी तीर्थक्षेत्र या केवळ त्यांच्या घोषणा आहेत. प्रत्यक्षात कामे होणारच नाही. त्यांनी शहराच्या विकासाला नेणे दूरच; पण आमचे दोन नगरसेवकही पळविले आहेत.'' 

कार्यक्रमास प्राथमिक शिक्षण मंडळ सभापती वनिता देठे, महिला बालकल्याण सभापती सुरेखा शहा, सभागृह नेता दिलीप पोवार, गटनेते शारंगधर देशमुख, तौफिक मुल्लाणी, संजय मोहिते, हरीभाई पटेल, वसंतराव देशमुख, नगरसेविका जयश्री चव्हाण, माजी महापौर सागर चव्हाण आदी उपस्थित होते. स्वागत व प्रास्ताविक माजी स्थायी समिती सभापती सचिन चव्हाण यांनी केले. 
 

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com