भाजपला आव्हान वाटणारं कॉंग्रेसचं दमदार नेतृत्व! 

"हाती घ्याल ते तडीस न्या' या ब्रीद वाक्‍याप्रमाणे काम करणारे, कोल्हापूर शहराच्या पाणीप्रश्‍नासाठी आमदारकी पणाला लावणारे आमदार म्हणजे सतेज पाटील. प्रचंड जिद्द, चिकाटी, कार्यकर्त्यांत मिसळण्याची वृत्ती यामुळे कमी वयात आमदार पाटील यांचे नेतृत्त्व राजकिय पटलावर फुलले आहे.
भाजपला आव्हान वाटणारं कॉंग्रेसचं दमदार नेतृत्व! 

"हाती घ्याल ते तडीस न्या' या ब्रीद वाक्‍याप्रमाणे काम करणारे, कोल्हापूर शहराच्या पाणीप्रश्‍नासाठी आमदारकी पणाला लावणारे आमदार म्हणजे सतेज पाटील. प्रचंड जिद्द, चिकाटी, कार्यकर्त्यांत मिसळण्याची वृत्ती यामुळे कमी वयात आमदार पाटील यांचे नेतृत्त्व राजकिय पटलावर फुलले आहे. 

सतेज पाटील हे शैक्षणिक क्षेत्रातच काम करणार होते. त्यांनी पुणे येथील आपल्या संस्थेत लक्षही घालण्यास सुरवात केली होती, पण परिस्थितीने त्यांना राजकारणात आणले. तत्कालिन मंत्र्यांनी डॉ. डी. वाय. पाटील शिक्षण संस्थेस मिळेल तेथे त्रास देण्यास सुरवात केली. त्यावेळी डॉ. डी. वाय. पाटील, डॉ. संजय पाटील यांच्यासोबत विचार विनिमय करुन सतेज यांनी राजकारणात प्रवेश करण्याचा निर्णय घेतला. 

प्रचंड जनसंपर्क, तरूणांची मोठी फौज, संस्थांचे जाळे आणि कसबा बावड्यासारखा भाग मागे असल्याने सतेज यांनी 2004 च्या निवडणुकीत करवीरचे सलग 25 वर्षे नेतृत्त्व केलेल्या आमदारांना पराभूत करून मैदान मारले. त्यावेळी ते अपक्ष होते. 2009 च्या निवडणुकीत बदललेल्या कोल्हापूर दक्षिण मतदार संघातून त्यांनी कॉंग्रेसच्या चिन्हावर निवडणूक लढवली. त्यावेळी त्यांच्या विरोधात खासदार धनंजय महाडीक होते, त्यांचा पराभव केला. त्यानंतर मंत्रीमंडळात ग्रामविकास, गृह, अन्न व औषध विभागाचे राज्यमंत्री म्हणून त्यांनी चार वर्षे काम केले. 

2014 साली मात्र देशात आणि राज्यातही सरकारविरोधात असलेल्या लाटेचा फटका त्यांना बसला. प्रचंड काम करूनही त्यांना पराभव स्विकारावा लागला. या पराभवाचे उट्टे त्यांनी माजी आमदार महादेवराव महाडीक यांचा विधानपरिषदेत पराभव करून काढले, कारण विधानसभेत श्री. महाडीक यांचे पुत्र अमल यांनी त्यांचा पराभव केला होता. महादेवराव महाडीकांना भाजपचा पाठिंबा होता. त्यामुळे एकप्रकारे त्यांनी भाजपच्या रणनितीचा पराभव घडवून आणला. 

भाजपच्या विजयाचा वारु चौखूर उधळत असताना भाजपने महाडीकांच्या मदतीने कोल्हापूर पालिका ताब्यात घेण्यासाठी पावले टाकली. खूप प्रयत्न केले, पण सतेज यांनी त्यांना जमू दिले नाही. भाजपची लाट कायम असताना आणि कॉंग्रेस पक्ष पराभवातून सावारलेला नसताना त्यांनी कोल्हापूर पालिकेत कॉंग्रेसची सत्ता आणून दाखवली, यातच सर्वकाही आले. कोणत्याही भागात, कोणत्याही नेत्याला पराजित करण्याचा आत्मविश्‍वास भाजपला आहे, मात्र सतेज यांनी त्यांना कोल्हापूरात फारसे यश मिळू दिलेले नाही. 
                                                      (बाबासाहेब उलपे) 
 

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com