मी बच्चा आहे की कोण, हे 2019 ला कळेल; समरजितसिंह गरजले! 

मी बच्चा आहे की कोण, हे 2019 ला कळेल; समरजितसिंह गरजले! 

कोल्हापूर : मी बच्चा आहे की कोण आहे, हे कागलची जनता 2019 ला दाखवेल. भावनिक होऊन जनतेला फसवण्याचे राज्यकर्त्यांचे दिवस आता संपले आहेत, कागलच्या इतिहासात ज्या चुका झाल्या आहेत, त्या वर्तमान काळात सुधारण्याची संधी द्या, असे आवाहन "म्हाडा' चे अध्यक्ष समरजितसिंह घाटगे यांनी केले. 

सिद्धनेर्ली (ता. कागल) येथील आयोजित केलेल्या चर्मकार समाज उद्बोधन मेळाव्यात ते बोलत होते.अध्यक्षस्थानी दत्तात्रय माने होते. 
गेल्या आठवड्यात कागल विधानसभा मतदार संघाचे राष्ट्रवादीचे आमदार हसन मुश्रीफ यांनी श्री. घाटगे हे बच्चा आहेत अशी टीका केली होती. या टीकेला श्री. घाटगे यांनी आज प्रत्युत्तर दिले. 

श्री. घाटगे म्हणाले,"कागल तालुक्‍यात बचत गटाचा वापर फक्‍त राजकारणासाठी केला आहे; पण आता तसे होऊ नये म्हणून कागल तालुक्‍यातील महिला बचतगटांसाठी उद्योग निर्मिती करणार आहे. त्याचबरोबर कागलमध्ये राजमाता जिजाऊंच्या नावाने बझार काढून त्यामध्ये सर्व उत्पादने महिला बचत गटाच्या माध्यमातून तयार करून ती विक्रीसाठी ठेवण्यात येणार आहे. येत्या शिवजयंतीला तालुक्‍यातील सर्व समाजांतील बांधवांनी एकत्र येऊन अशी शिवजयंती साजरी करू या, की कागलचे नाव संपूर्ण महाराष्ट्रात गाजले पाहिजे. त्यासाठी महापुरुषांना समाजाच्या चौकटीत न बांधता सर्व समाजांतील लोकांनी एकत्र येऊन सगळ्याच महापुरुषांना वंदन केले पाहिजे, असेही ते म्हणाले. अनिल पवार, सुनील मगदूम, शिवाजी गाडेकर आदींनी मनोगत व्यक्‍त केले. 

यावेळी अण्णा सांडुगडे, पुष्पलता मगदूम, सुनील मगदूम, अनिल पवार, शिवाजी गाडेकर, सिद्धनेर्लीच्या सरपंच नीता पाटील, मनोहर घराळ, तानाजी माने यांच्यासह चर्मकार समाजबांधव, नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.प्रास्तविक मारुती माने यांनी केले. आभार धनाजी माने यांनी मानले. 


 

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com