Kolhapur Riesh Deshmukh snaps a selfie with Satej Bunty Patil | Sarkarnama

जेंव्हा रितेश देशमुख  बंटी पाटलांसोबत सेल्फी काढतात ... 

निवास चौगले : सरकारनामा 
सोमवार, 23 ऑक्टोबर 2017

कोल्हापूर :   गेल्या आठवड्यात  चित्रपट  अभिनेते रितेश देशमुख कोल्हापुरात होते . त्यावेळी त्यांनी चक्क   माजी मंत्री सतेज ( बंटी)  पाटील यांच्या सोबत सेल्फी काढला . निमित्त होते बंटी पाटील यांच्या 'माणुसकीची भिंत' उपक्रमाचे . 

कोल्हापूर :   गेल्या आठवड्यात  चित्रपट  अभिनेते रितेश देशमुख कोल्हापुरात होते . त्यावेळी त्यांनी चक्क   माजी मंत्री सतेज ( बंटी)  पाटील यांच्या सोबत सेल्फी काढला . निमित्त होते बंटी पाटील यांच्या 'माणुसकीची भिंत' उपक्रमाचे . 

सतेज पाटील यांच्या पुढाकाराने कोल्हापुरात 'माणुसकीची भिंत' हा उपक्रम राबवला जातो ,  या वर्षी कोल्हापूरकरांनी उत्स्फूर्त प्रतिसाद देऊन   या माध्यमातून   दिवाळी निमित्त वापरता येतील असे कपडे, लहान मुलांचे खेळणे आणि इतर साहित्य  आणून दिले . १४ आणि १५ ऑक्टोबर रोजी दसरा चौक येथे   देणाऱ्यांचे हात हजार आणि घेणाऱ्यांचा आनंद अमाप '' असे चित्र  माणुसकीची भिंत या उपक्रमात दिसले .

चित्रपट अभिनेते रितेश देशमुख हे माजी मुख्यमंत्री कै . विलासराव देशमुख यांचे चिरंजीव . विलासराव देशमुख आणि डी. वाय . पाटील यांचे स्नेहाचे संबंध होते . सतेज पाटील आणि रितेश देशमुख यांनी मैत्रीचा  हा वारसा दुसऱ्या पिढीतही जपला आहे ,

 रितेश देशमुख यांनी माणुसकीची भिंत उपक्रमास भेट दिली होती . एवढेच नव्हे तर सतेज पाटील यांच्याविषयी गौरवोद्गार देखील काढले होते . या दोघांनी  अंबाबाईचे परस्परांसोबत जाऊन दर्शन  घेतले . त्यानंतर रितेश यांनी काढलेला सेल्फी सतेज पाटील यांनी नुकताच  फेसबुकवर शेयर केला आहे . 
 

संबंधित लेख