kolhapur-raju-shetti-chandrakant-patil-sadabhau-khot-suresh-halwankar | Sarkarnama

राजू शेट्टींचे आंदोलनाचे दुकाने बंद; चंद्रकांत पाटील, सदाभाऊ खोत आणि सुरेश हाळवणकरांची टीका 

सदानंद पाटील
बुधवार, 24 ऑक्टोबर 2018

सरकार ऊस दर देण्यासाठी प्रयत्नशील असताना काहीजण शेतकऱ्यांना आंदोलनासाठी चेतवत आहे. मात्र गेल्या चार वर्षात त्यांनी संधीच मिळाली नाही. काहींची आंदोलनाची दुकाने बंद झाली आहेत, अशी घणाघाती टीका पालकमंत्री चंद्रकांत पाटील, मंत्री सदाभाऊ खोत, आमदार सुरेश हाळवणकर यांनी खासदार राजू शेट्टी यांच्यावर केली. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थितीत या नेत्यांनी खासदार शेट्टींवर हल्लाबोल केला.

कोल्हापूर : सरकार ऊस दर देण्यासाठी प्रयत्नशील असताना काहीजण शेतकऱ्यांना आंदोलनासाठी चेतवत आहे. मात्र गेल्या चार वर्षात त्यांनी संधीच मिळाली नाही. काहींची आंदोलनाची दुकाने बंद झाली आहेत, अशी घणाघाती टीका पालकमंत्री चंद्रकांत पाटील, मंत्री सदाभाऊ खोत, आमदार सुरेश हाळवणकर यांनी खासदार राजू शेट्टी यांच्यावर केली. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थितीत या नेत्यांनी खासदार शेट्टींवर हल्लाबोल केला.

मंत्री पाटील म्हणाले, की मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे कार्यक्षम मुख्यमंत्री आहेत .शेतकऱ्यांची त्याना काळजी आहे. त्यामुळेच ते शेतकऱ्यांच्या हिताचे धडाधड निर्णय घेत आहेत. परिणामी गेल्या चार वर्षात ऊस दरासाठी आंदोलन झालेले नाही. त्यामुळेच आंदोलन करणाऱ्यांची दुकाने बंद झाली असल्याचा टोला मंत्री पाटील यांनी शेट्टीना लावला.

आमदार हाळवणकर म्हणाले, राजू शेट्टी यांना स्वतःच्या खासदारकीची काळजी लागून राहिली आहे. त्यामुळेच ते काँग्रेस आणि राष्ट्रवादीशी हातमिळवणी करत आहेत. त्यांना फक्त आपल्या पदाची काळजी आहे.सर्व सामान्य कार्यकर्त्यांना कधी ते मोठे होऊ देत नाहीत. मंत्री खोत यांचा राजीनामा ही त्यांनीच मागितला, असा आरोपही त्यांनी केला.

संबंधित लेख