काहींच्या 'मी'पणामुळे काँग्रेसची पिछेहाट : महाडीकांची फटकेबाजी

माजी पंतप्रधान स्वर्गीय राजीव गांधी यांच्या जयंतीनिमित्त काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष पी. एन. पाटील यांनी आयोजित केलेल्या सद्‌भावना दौडसाठी श्री. महाडीक उपस्थित होते. राज्याचे माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण, आमदार उल्हास पाटील, आनंदराव पाटील, रमणसिंग आदि प्रमुख पाहुणे होते. दसरा चौकातील शहाजी कॉलेजच्या प्रांगणातून या दौडला सुरूवात झाली. तत्पुर्वी नेत्यांच्या गराड्यात थांबलेल्या महाडीक यांनी चौफेर फटकेवाजी करून काँग्रेस नेत्यांची चांगलीच फिरकी घेतली.
काहींच्या 'मी'पणामुळे काँग्रेसची पिछेहाट : महाडीकांची फटकेबाजी

कोल्हापूर : ''काँग्रेसने माझी पक्षातून हकालपट्टी केली असली तरी मी अजून आहे तिथेच आहे. जिल्हाध्यक्ष पी. एन. पाटील आहेत म्हणून पक्ष आहे, त्यांनाही पटवून घेतले जात नाही. काहींच्या मी पणामुळे काँग्रेस संपत आहे,'' अशा शब्दात काँग्रेसचे माजी आमदार महादेवराव महाडीक यांनी फटकेबाजी केली आहे. श्री. महाडीक यांच्या बोलण्याचा रोख अर्थातच आमदार सतेज पाटील यांच्या दिशेने होता.

माजी पंतप्रधान स्वर्गीय राजीव गांधी यांच्या जयंतीनिमित्त काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष पी. एन. पाटील यांनी आयोजित केलेल्या सद्‌भावना दौडसाठी श्री. महाडीक उपस्थित होते. राज्याचे माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण, आमदार उल्हास पाटील, आनंदराव पाटील, रमणसिंग आदि प्रमुख पाहुणे होते. दसरा चौकातील शहाजी कॉलेजच्या प्रांगणातून या दौडला सुरूवात झाली. तत्पुर्वी नेत्यांच्या गराड्यात थांबलेल्या महाडीक यांनी चौफेर फटकेवाजी करून काँग्रेस नेत्यांची चांगलीच फिरकी घेतली.

अकराच्या सुमारास शमहाडीक हे शहाजी कॉलेजमध्ये आले, त्यांच्यासोबत 'गोकुळ' चे अध्यक्ष विश्‍वास पाटील होते. कार्यक्रमाचे प्रमुख पाहुणे पृथ्वीराज चव्हाण यांना येण्यास उशीर असल्याने महाडीक हे थेट इतर काँग्रेस नेते बसलेल्या खोलीत गेले. त्याठिकाणी आमदार उल्हास पाटील होते. त्यांनी आपल्या स्टाईलनेच बोलायला सुरूवात केली. ते म्हणाले, ''मी कॉंग्रेस सोडलेली नाही, मला काढून टाकले आहे, पण मी आज आहे तिथेच आहे.'' हे बोलतच श्री. महाडीक त्या खोलीतून बाहेर पडल्याने नेत्यांची चांगलीच धांदल उडाली. बाहेर येताच त्यांना राजीव सुतगिरणीचे संचालक भारत पाटील-भुयेकर यांनी आत जाण्याची विनंती केली. त्यावर ''मला त्यांनी बाहेर काढले आहे आणि तू कशाला आत घालवतोस,'' असे प्रत्युत्तर दिले.

या खोलीतून बाहेर येताच त्यांच्याभोवती कार्यकर्त्यांचा गराडा पडला. जिल्ह्यात काही जणांच्या 'मी' पणामुळे काँग्रेसची वाट लागली आहे. आवाडेदादा बाजूला गेले, पी. एन. आहेत म्हणून काँग्रेस जिवंत आहे. पण काही मंडळी त्यांनाही पटवून घेत नसल्याचा टोला महाडीक यांनी आमदार सतेज पाटील यांचे नांव घेता लगावला.

सरकारनामाच्या अन्य बातम्या :

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com