kolhapur politics | Sarkarnama

बंटी- मुन्नांनी एकत्र यावे : संभाजीराजे 

सरकारनामा ब्युरो
मंगळवार, 2 मे 2017

चंद्रकांतदादांमध्ये जादू आहे. त्यांनी कोल्हापूर जिल्ह्यातील सर्व मराठे नेते आपल्या पक्षात नेले आहेत. दादाही मराठा समाजातील आहेत. त्यामुळे त्यांनी मराठा नेत्यांच्यात मराठापण जागे ठेवण्याचे आवाहन राजेंद्र कोंढरे यांनी केले. 

कोल्हापूर : जिल्ह्यातील चांगल्या कामासाठी आमदार सतेज पाटील (बंटी) व खासदार धनंजय महाडीक (मुन्ना) यांनी एकत्र आले पाहिजे. जिल्ह्यातील मराठा समाजाचे  उभारण्यासाठी या दोघांबरोबरच सर्वांनीच योगदान दिले पाहिजे, असे आवाहन खासदार संभाजीराजे यांनी केले. 

संभाजीराजे म्हणाले, मराठा भवनासाठी मदत करायची असेल तर आपण आमदार सतेज पाटील किंवा खासदार धनंजय महाडीक नाही! जी काही मदत करायची असेल ती ग्रंथालय किंवा विज्ञान केंद्राची सुरवात करण्यासाठी केली जाईल. यावर सभागृहात जोरदार हशा पिकला. पण, परिस्थितीचा नूर ओळखून संभाजीराजे म्हणाले, आमदार सतेज पाटील आणि खासदार धनंजय महाडीक चांगल्या कामासाठी एकत्र आले तर बरीच कामे सहज होतील. दिल्लीत आपण आणि श्री महाडीक हे जिल्ह्याचे प्रश्‍न पोटतिडकीने मांडतो. तसे जिल्ह्यात बंटी आणि मुन्ना एकत्र आले तर खूपच चांगली कामे होतील. असेही संभाजीराजे यांनी सांगितले. यावर सर्वांनीच टाळ्या वाजवून दाद दिली.  

 

संबंधित लेख