kolhapur p n patil will lead `Gokul'  | Sarkarnama

पी. एन. पाटील यांच्याकडे `गोकुळ'चे नेतृत्व देण्याचे नियोजन 

सुनील पाटील 
शुक्रवार, 28 सप्टेंबर 2018

कोल्हापूर  : पी. एन. पाटील, सतेज पाटील, अरूण नरके, अरूण डोंगळे, सतेज पाटील आणि चंदगडकर पाटील यांना एकत्र करून "गोकुळ'चे नेतृत्व पी.एन.पाटील यांच्याकडे देण्याचा प्रयत्न सुरू आहे. यानिमित्ताने दोन्ही कॉंग्रेस खऱ्या अर्थाने एकत्र येण्याची गरज आहे. त्यांची सुरूवात गोकुळमधून करण्याचा प्रयत्न असल्याचे आमदार हसन मुश्रीफ यांनी सांगितले. 

यावर क्षणाचाही विलंब न करता आमदार सतेज पाटील म्हणाले, कदाचित काल (गुरूवार) जिल्हा बॅंकेच्या वार्षिक सभेवेळी झालेल्या भेटीचा हा परिणाम असावा. 

गोकुळ मल्टिस्टेट होण्याला विरोध करण्यासाठी शासकीय विश्रामगृहात झालेल्या बैठकीनंतर आमदार मुश्रीफ आणि आमदार पाटील यांनी पत्रकारांशी संवाद साधला.
 
श्री मुश्रीफ म्हणाले, गोकुळ हा जिल्हा संघ आहे. सत्ताधाऱ्यांना केवळ आपली सत्ता जाईल या भितीने ते मल्टिस्टेट करत आहेत. तरीही, पी.एन. पाटील यांच्या नेतृत्व देण्याचे नियोजन आहे. 

दरम्यान, गोकुळ संघात सत्ताधाऱ्यांनी घेतलेल्या बैठकीमध्ये पत्रकारांनी हाच प्रश्‍न पी.एन. पाटील यांना केला असता सध्या गोकुळमध्ये आमचेच नेतृत्व आहे. अरूण नरके यांना जायचे असेल तर त्यांनी पत्रकारांना तसे सांगावे, असे म्हणून टोला लगावला. 

संबंधित लेख