Kolhapur new Mandlik Sugar factory unopposed | Sarkarnama

मंडलिक कारखाना निवडणूक बिनविरोध : आठ विद्यमान संचालकांना वगळले 

सकाळ वृत्तसेवा
सोमवार, 19 जून 2017

कोल्हापूर:  हमीदवाडा (ता. कागल) येथील खासदार सदाशिवराव मंडलिक साखर कारखान्याची निवडणूक अपेक्षप्रमाणे बिनविरोध झाली. संचालक पदाच्या 21 जागांसाठी 22 उमेदवारांचे अर्ज रिंगणात राहीले, सेनापती कापशी गटातील एका उमेदवाराचा अर्ज रिंगणात राहीला. या निवडीची अधिकृत घोषणा 3 जुलै या अर्ज माघारीच्या अखेरच्या दिवशी करण्यात येणार आहे. 

कोल्हापूर:  हमीदवाडा (ता. कागल) येथील खासदार सदाशिवराव मंडलिक साखर कारखान्याची निवडणूक अपेक्षप्रमाणे बिनविरोध झाली. संचालक पदाच्या 21 जागांसाठी 22 उमेदवारांचे अर्ज रिंगणात राहीले, सेनापती कापशी गटातील एका उमेदवाराचा अर्ज रिंगणात राहीला. या निवडीची अधिकृत घोषणा 3 जुलै या अर्ज माघारीच्या अखेरच्या दिवशी करण्यात येणार आहे. 

दरम्यान, नव्या संचालक मंडळात 12 नव्या चेहऱ्यांना संधी देण्यात आली आहे. छाननीत उपाध्यक्ष प्रकाश पाटील यांच्यासह चार संचालकांचे अर्ज अवैध ठरले तर आज आठ विद्यमान संचालकांनी माघार घेतली. मावळत्या संचालक मंडळात संस्था प्रतिनिधी गटातून संचालक असलेल्या प्रा. संजय मंडलिक यांनी या गटातून मुलगा विरेंद्र मंडलिक यांची उमेदवारी कायम ठेवून स्वतः मुरगुड गटातील उमेदवार राहीले आहेत.

 

विद्यमान दोन्ही महिला संचालकांना वगळून त्यांच्याऐवजी विद्यमान संचालक नंदकुमार घोरपडे यांच्या पत्नी सौ. नंदिनी व सुनिता चौगले यांना उमेदवारी देण्यात आली आहे. नंदकुमार घोरपडे, गणपतराव मुसळे, एन. एस. चौगले, रामचंद्र सांगले, चंद्रकांत गवळी यांनी माघार घेतली तर उपाध्यक्ष प्रकाश पाटील, आनंदा फराक्‍टे, विश्‍वास कुराडे, बाबगोंडा पाटील या विद्यमानांचे अर्ज छाननीत बाद झाले. 

या कारखान्यासाठी 12 जुलै रोजी मतदान होणार होते. विरोधी मुश्रीफ गटाने सत्तारूढ गटाला पाठिंबा दिल्याने त्यांच्या गटाकडून अर्ज दाखल झाले नव्हते. त्याचवेळी ही निवडणूक बिनविरोध होणार हे स्पष्ट होते. 

अर्ज दाखल करण्याच्या शेवटच्या दोन दिवसांत 66 उमेदवारांचे अर्ज दाखल झाले होते. छाननीत दहा जणांचे अपात्र ठरले, तर आज 32 जणांनी माघार घेतली. त्यामुळे 21 जागांसाठी 22 जणांचे अर्ज राहीले. सेनापती कापशी गटातील प्रदीप चव्हाण हे उद्या अर्ज माघार घेणार आहेत. 
.
संभाव्य बिनविरोध संचालक असे 

गट क्र. 1- मुरगुड - प्रा. संजय मंडलिक, मारूती काळुगडे, दत्तात्रय तुकाराम सोनाळकर 
क्र. 2 - बोरवडे - बापुसो पांडूरंग भोसले-पाटील, दिनकर बाळा पाटील, मसू कृष्णा पाटील 
क्र. 3 - कागल - शिवाजीराव दौलतराव इंगळे, शहाजी कृष्णा पाटील, धनाजी बाळू बाचणकर 
क्र. 4 ः सांगाव - बंडोपंत रामचंद्र चौगुले, शंकर व्यंकू पाटील, कैलाश माधवराव जाधव 
क्र. 5 - सेनापती कापशी - आनंदा तुकाराम मोरे, दत्तात्रय विष्णू चौगले, आप्पासो तांबेकर, प्रदीप चव्हाण (माघार नाही) 
संस्था गट - विरेंद्र संजय मंडलिक 
अनुसुचित जाती गट - चित्रगुप्त दिनकर प्रभाळवकर 
महिला प्रतिनिधी - सौ. नंदिनी नंदकुमार घोरपडे, सौ. सुनिता चौगले 
भटक्‍या विमुक्त गट - जयसिंग दत्तात्रय गिरीबुवा 
इतर मागासवर्गीय प्रतिनिधी - शहाजी शंकर यादव 

हे नवीन चेहरे 
धनाजी बाचणकर, दत्तात्रय सोनाळकर, मारूती काळुगडे, मसू पाटील, सौ. नंदा घोरपडे, सुनिता चौगले, दिनकर बाळा पाटील, शहाजी पाटील, आनंदा तुकाराम मोरे, दत्तात्रय चौगले, कैलाश जाधव, चित्रगुप्त प्रभावळकर 

 

संबंधित लेख