अपमानाच्या जखमा मी ठसठसत ठेवतो, बदला घेतल्यानंतरच त्या बऱ्या होतील! 

ज्या ज्यावेळी अशा घटना घडतात, त्यामुळे मला होणारी अपमानाची जखम मी कधी बरी होऊ देत नाही. ही जखम मी नेहमी सारखी ठसठसत ठेवतो. आयुष्यात यापुर्वी एकदा व आता अशा दोन जखमा मला झाल्या आहेत, बदला घेतल्यानंतरच त्या बऱ्या होतील, असे राष्ट्रवादीचे आमदार हसन मुश्रीफ यांनी सांगितले.
अपमानाच्या जखमा मी ठसठसत ठेवतो, बदला घेतल्यानंतरच त्या बऱ्या होतील! 

कोल्हापूर : ज्या ज्यावेळी अशा घटना घडतात, त्यामुळे मला होणारी अपमानाची जखम मी कधी बरी होऊ देत नाही. ही जखम मी नेहमी सारखी ठसठसत ठेवतो. आयुष्यात यापुर्वी एकदा व आता अशा दोन जखमा मला झाल्या आहेत, बदला घेतल्यानंतरच त्या बऱ्या होतील, असे राष्ट्रवादीचे आमदार हसन मुश्रीफ यांनी सांगितले. 

महापालिकेतील स्थायी समिती निवडणुकीत राष्ट्रवादीचा पराभव झाल्याबाबत ते म्हणाले, "राजकारणात व समाजकारण मी अशा अनेक प्रसंगांना सामोरे जाण्याची वेळ माझ्यावर आली. पण या निवडणुकीनंतर सौ. पाटील ह्या रडत बाहेर पडल्या, आघाडीच्या इतर महिलांची सदस्यांची अवस्था वाईट होती. एखाद्या भगिनीला न्याय द्यायचे नाही असे कटकारस्थान रचले गेले. त्यामुळे मी प्रचंड अस्वस्थ आहे. त्यामुळे या दोन गद्दार व सुर्याजी पिसाळ यांचा मी जाहीर निषेध करतो.' 

या घडामोडीत कोण होते आणि नव्हते हे लपून रहाणार नाही. कुणाचे बळ असल्याशिवाय हे घडू शकणार नाही, अशांचा शोध घेण्याचे काम सुरू आहे, त्यांनाही धडा शिकवला जाईल, असा इशारा श्री. मुश्रीफ यांनी दिला. 

ते म्हणाले,"पक्षांतर बंदी कायदा आल्यानंतर अशा घटना टळतील असे वाटत होते, पण यानिमित्ताने पुन्हा धक्‍कादायक खेळ कोल्हापुरात सुरू झाल्याचे दिसते. हा प्रसंग कोणावरही येऊ नये. राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांनीही आता संयम राखावा. भविष्यात अनेक निवडणुका आहेत, त्याला सामारे जाऊन सुंदर शहराचे स्वप्न साकार करूया.'  

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com