जादुगारांनी विधानपरिषद का राखली नाही?; मुश्रीफांचा सवाल!

माजी आमदार महादेवराव महाडीक हे या घडामोडीमागचा "मीच जादूगार' म्हणत असतील या जादुगारांनी स्वतःचा विधानपरिषदेतील पराभव का वाचवला नाही ? असा सवालही श्री. मुश्रीफ यांनी यावेळी उपस्थित केला.
जादुगारांनी विधानपरिषद का राखली नाही?; मुश्रीफांचा सवाल!

कोल्हापूर : महापालिकेतील स्थायी समितीच्या सभापती निवडीत पक्षाच्या विरोधात काम केलेल्या गद्दार व सुर्याजी पिसाळच्या प्रवृत्तीचे नगरसेवक अजिंक्‍य चव्हाण व अफजल पिरजादे यांना धडा शिकवल्याशिवाय स्वस्थ बसणार नाही. पैसे घेऊन विकलेल्या या दोघांचेही राजकारण आणि समाजकारण त्यांच्या कृत्याने संपुष्टात आले असून भविष्यात त्यांची लहान मुलेही टर उडवतील, अशी टीका राष्ट्रवादीचे नेते व आमदार हसन मुश्रीफ यांनी पत्रकारांशी बोलताना केली. 

माजी आमदार महादेवराव महाडीक हे या घडामोडीमागचा "मीच जादूगार' म्हणत असतील या जादुगारांनी स्वतःचा विधानपरिषदेतील पराभव का वाचवला नाही ? असा सवालही श्री. मुश्रीफ यांनी यावेळी उपस्थित केला. 

श्री. मुश्रीफ म्हणाले,"स्थायी समितीत राष्ट्रवादीचे तीन सदस्य आहेत. हे तिन्हीही सदस्य पहिल्यांदाच नगरसेवक झाले आहेत. यापैकी श्री. पिरजादे यांना दोनवेळा प्रभाग समितीचे सभापतीपद तर श्री. चव्हाण यांना शिक्षण समितीचे सभापती पद दिले. या दोघांच्या दोन-तीन टर्म झाल्या आणि त्यांना पदे दिले नाहीत, त्यांच्यावर अन्याय झाला असे काही झालेले नाही. महापालिकेच्या इतिहासात "स्थायी' सारख्या महत्त्वाच्या समितीचे सभापतीपद महिलेला द्यावे या हेतूने कार्यकर्त्यांशी चर्चा करून सौ. मेघा पाटील यांचे नांव निश्‍चित केले होते.' 

ते म्हणाले,"राजकारणात व समाजकारण मी अशा अनेक प्रसंगांना सामोरे जाण्याची वेळ माझ्यावर आली. पण या निवडणुकीनंतर सौ. पाटील ह्या रडत बाहेर पडल्या, आघाडीच्या इतर महिलांची सदस्यांची अवस्था वाईट होती. एखाद्या भगिनीला न्याय द्यायचे नाही असे कटकारस्थान रचले गेले. त्यामुळे मी प्रचंड अस्वस्थ आहे. त्यामुळे या दोन गद्दार व सुर्याजी पिसाळ यांचा मी जाहीर निषेध करतो.'  

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com