kolhapur meyor election | Sarkarnama

सरिता मोरे की आणखी कुणी...महापौरपदाची लॉटरी कोणाला? 

सरकारनामा ब्युरो
बुधवार, 5 डिसेंबर 2018

सत्तेच्या राजकारणात महापौर पद पुढील वर्षासाटी राष्ट्रवादीच्या वाट्याला आले आहे.

कोल्हापूर : राष्ट्रवादी कॉंग्रेसच्या महापौरपदाची लॉटरी उद्या (ता. 5) फुटणार आहे. आमदार हसन मुश्रीफ कुणाच्या नावाची चिठ्ठी काढतात, याकडे सर्वांचे लक्ष लागून राहिले आहे. दुपारी तीन ते पाच यावेळेत उमेदवारी अर्ज दाखल केले जातील. राष्ट्रवादीच्या उमेदवाराचे नाव निश्‍चित झाल्यानंतर भाजप ताराराणी आघाडीच्या उमेदवाराचे नाव निश्‍चित होईल. 

तीन ते पाच या दोन तासात कमालीच्या राजकीय घडामोडींना वेग येणार आहे. 

आमदार मुश्रीफ यांनी आज सायंकाळी महापौर पदाच्या इच्छुकांच्या मुलाखती घेतल्या. सरिता मोरे, सूरमंजिरी लाटकर, माधवी गवंडी, अनुराधा खेडकर, मेघा पाटील यांनी मुलाखती दिल्या. कॉंग्रेस राष्ट्रवादीच्या सत्तेच्या राजकारणात महापौर पद पुढील वर्षासाठी राष्ट्रवादीच्या वाट्याला आले आहे. गेल्या पंधरा दिवसापासून इच्छुकांनी जोरदार फिल्डींग लावली. आज त्यांची खऱ्या अर्थाने परीक्षा होती, सायंकाळी सातच्या सुमारास शासकीय विश्रामधाम येथे राष्ट्रवादीच्या सदस्यांसह इच्छुकांची मते मुश्रीफ यांनी जाणून घेतली. 

आपल्याला महापौर का हवे आहे ? पक्षासाटी योगदान, याची माहिती घेतली गेली. इच्छुकांच्या कार्यकर्त्यांनी गर्दी केली होती.  मुश्रीफ नेमका कोणता प्रश्‍न विचारणार याची धाकधूक लागली होती. एखाद्या इच्छुक उमेदवार मुलाखत देऊन बाहेर पडला की दूसऱ्याच्या चेहऱ्यावर तणावाचे भाव उमटत होते. आगामी लोकसभा निवडणूक पाहता महापौर पदाचा उमेदवार निश्‍चित होणार असल्याने मुश्रीफ नेमके कुणाच्या नावाला पसंती देतात याकडे लक्ष लागून राहिले आहे.
 

संबंधित लेख