kolhapur maratha morcha criticise devendra fadavnis | Sarkarnama

श्रीदेवीसाठी मुख्यमंत्र्यांनी पहाटे 5 ला ट्‌वीट केले, पण 23 मराठ्यांसाठी त्यांना वेळ नाही! 

सरकारनामा ब्युरो
गुरुवार, 9 ऑगस्ट 2018

राज्यात मराठा आरक्षणासाठी आक्रमक आंदोलन सुरु आहे. मात्र कोल्हापूरच्या सकल मराठा समाजाने 16 दिवस ठिय्या आंदोलन सुरु केले आहे. पूर्णपणे कायदा आणि सुव्यवस्थेचा आदर ठेवत शांततेत हे आंदोलन सुरु आहे. तरीही पोलीसी बळाचा वापर करुन हे आंदोलन चिरडण्याचा प्रयत्न होत आहे. लाखो लोकांनी आज एकत्र येवून शांततेत आंदोलन केले. असे असताना मुख्यमंत्री फडणवीस यांनी याची दखल घेवून, चर्चा करण्याची आवश्‍यकता होती. मराठा आरक्षण देण्यास मुख्यमंत्री विलंब करत असतील तर त्यांना राज्यात फिरु न देण्याचा इशारा यावेळी देण्यात आला. 
 

कोल्हापूर : मराठा आरक्षणासाठी आत्तापर्यंत 23 आत्महत्त्या झाल्या आहेत. मात्र राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी ना श्रध्दांजली वाहिली, ना दु:ख व्यक्‍त केले. यावरुन मराठा समाजाबददलच्या त्यांच्या भावना स्पष्ट होतात. म्हणूनच त्यांनी राजीनामा द्यावा, अशी मागणी कोल्हापूर येथील सकल मराठा समाजाने पत्रकार परिषदेत केली. 

आरक्षण देण्याची घोषणा करुनही शासनाने हा प्रश्‍न मार्गी लावलेला नाही. त्यामुळे संपूर्ण समाजात अस्वस्थता पसरली आहे. त्यातूनच राज्यातील 23 मराठा बांधवांनी आत्महत्त्या केल्या आहेत. अभिनेत्री श्रीदेवी वारल्यानंतर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी पहाटे पाच वाजता ट्‌टीवट करुन दु:ख व्यक्‍त केले. मात्र आज राज्यातील 23 मराठा बांधवांनी आत्महत्त्या करुनही मुख्यमंत्र्यांना जाग आलेले नाही. ते अत्यंत असंवेदनशिल मुख्यमंत्री आहेत. या 23 लोकांच्या मृत्यूची जबाबदारी त्यांच्याच खांद्यावर आहे. ते आणखी थोडा काळ मुख्यमंत्री राहिले तर आणखी आत्महत्त्या वाढतील. म्हणूनच त्यांनी राजीनामा द्यावा, अशी मागणी केली. 

 

अधिक राजकीय बातम्यांसाठी सरकारनामा अॅप डाऊनलोड करा
Play Store    App Store

संबंधित लेख