kolhapur loksabha seat i wil be win satej patil | Sarkarnama

कोल्हापुर लोकसभेची जागा कॉंग्रेसकडे घ्या, उमेदवार मी निवडून आणतो, सतेज पाटलांची डरकाळी 

सुनिल पाटील
शनिवार, 1 सप्टेंबर 2018

कोल्हापूर : " 2019 च्या लोकसभेच्या निवडणुकीत कोल्हापूर मतदारसंघातील जागा कॉंग्रेसला द्यावी. या जागेवरुन कॉंग्रेसचा उमेदवार निवडून आणण्याची जबाबदारी आपली असेल. कोल्हापुरातून खासदार निवडून आणल्याशिवाय मुंबईला तोंडही दाखवणार नाही,' अशी मागणी माजी मंत्री आणि आमदार सतेज पाटील यांनी मल्लिकार्जुन खर्गे आणि अशोक चव्हाण यांच्याकडे केली. 

जनसंघर्ष यात्रेनिमित्त आयोजित कार्यकर्त्यांच्या मेळाव्यात पाटील बोलत होते. 

पाटील म्हणाले, ""कोल्हापूर दक्षिणमधून कोणी एखादा नवखा उठतो आणि 22 दिवसांत आमदार होतो. लोकसभेत पक्षाच्या बंधनात आम्ही अडकलो. लोकसभेला आम्ही ज्यांना मदत केली, त्यांनीच गद्दारी करण्याचे काम केले. त्यामुळे 2019 मध्ये मात्र कोल्हापूर लोकसभा कॉंग्रेसकडे घ्यावी. कॉंग्रेसकडून जो उमेदवार उभा राहणार, त्याला निश्‍चितपणे निवडून आणले जाईल. हातकणंगले मतदारसंघ राष्ट्रवादीकडे राहू दे; पण कोल्हापूर आपल्याकडेच आले पाहिजे. कॉंग्रेसचा उमेदवार निवडून आणण्याची जबाबदारी आपण स्वतः घेऊ. फक्त एकदा माझ्यावर जबाबदारी टाका.'' 

""कोल्हापूर कॉंग्रेसचा बोलेकिल्ला आहे. कोल्हापूरमध्ये 25 वर्षे उदयसिंह गायकवाड यांना खासदार करण्याची किमया केली आहे. एका विचारधारेचा जिल्हा आहे. कॉंग्रेसला बळकट करायचे असेल, तर सर्व निवडणुकांत कॉंग्रेसचा झेंडा कसा फडकवला जाईल हे पाहावे लागेल,'' असेही आमदार पाटील यांनी सांगितले. 

संबंधित लेख