कोल्हापुरात उपक्रम: शासकीय कार्यालये उजळणार सौरउर्जेने 

कार्यालयनिहाय असे आहेत प्रकल्पशिवाजी विद्यापीठ - 180 किलोवॅटजिल्हा परिषद - 80 किलोवॅटजिल्हाधिकारी कार्यालय - 65 किलोवॅटवनविभाग - 30 किलोवॅटमहापालिका - 20 किलोवॅट
kolhapur-zp
kolhapur-zp

कोल्हापूर: विजेची वाढती मागणी व त्या तुलनेत होणारा कमी पुरवठा यावर मार्ग काढण्यासाठी सौरऊर्जा वापराचा पर्याय पुढे येत आहे.

प्रशासनाचे प्रमुख कार्यालय असलेल्या जिल्हाधिकारी कार्यालयासह जिल्हा परिषद, शिवाजी विद्यापीठ, महापालिका व वनविभागाच्या इमारतीवर सौरऊर्जा प्रकल्प बसवण्याचे काम युध्दपातळीवर सुरू आहे. जिल्हाधिकारी कार्यालयातील हा प्रकल्प येत्या दोन दिवसांत सुरू होण्याची शक्‍यता आहे. 


दरम्यान, जिल्ह्यातील वडगांवसह गडहिंग्लज नगरपालिकेतही असे प्रकल्प सुरू करण्याचे प्रस्ताव सादर झाले आहेत. इतर नगरपालिकांसह शासनाची तालुका पातळीवर असलेली कार्यालयेही सौरऊर्जेने उजळून टाकण्याचा प्रयत्न असून शासन दरबारी यासाठी जोरदार हालचाली सुरू आहेत. 


मागणीच्या तुलनेत वीजेचा पुरवठा कमी असला तरी त्यावरील पर्यायांबाबत मात्र जनजागृतीचा अभाव दिसतो. पाणी गरम करण्यासाठीचा सोलर हिटर वगळता घरगुती वापरासाठी सोलरचा वापर ही संकल्पनाच अजून मूळ धरत नाही अशी स्थिती आहे. यावर उपाय म्हणून ग्रामीण भागातील रस्ते सौर उर्जेने उजळण्याचा प्रयत्न झाला. पण यासाठी बसवण्यात येणाऱ्या बॅटरीचीच चोरी होऊ लागली परिणामी बहुंताशी गावांत सौर उर्जेच्या बलाचे खांब नुसतेच उभे आहेत. 


नागरीकांत जनजागृती करूच पण त्याची सुरूवात आपल्यापासून करू हा हेतू डोळ्यापुढे ठेवून जिल्ह्यातील प्रमुख शासकीय कार्यालये पहिल्यांदा सौरउर्जेने उजळण्याचा प्रयत्न सुरू झाला आहे. या प्रकल्पातून तयार होणारी वीज महावितरणला द्यायची व त्या बदल्यात कार्यालयाचे महावितरकडून येणारे बील माफ करून घ्यायचे असे हे प्रस्ताव आहेत. या माध्यमातून सौरउर्जेचा तर वापर वाढेलच पण बिलापोटी द्यावी लागणाऱ्या लाखो रूपयांची बचत होणार आहे. शिवाजी विद्यापाठीचे महिन्याचे वीजेचे बील 18 ते 19 लाख रूपये येते. 


जिल्हाधिकारी कार्यालयातील 60 किलोवॅटचा हा प्रकल्प अंतिम टप्प्यात असून येत्या आठवडाभरात त्यातून वीजनिर्मिती सुरू होईल. शिवाजी विद्यापीठातील 180 किलोवॅटच्या या प्रकल्पाची निविदा निघाली आहे. 
..
किती वीज मिळणार 
एक किलोवॅटच्या प्रकल्पातून दिवसाला किमान 4.50 युनिट वीज मिळणार आहे. या सुत्रानुसार शिवाजी विद्यापीठातील प्रकल्पातून दिवसाला 810 युनिट वीज निर्मिती शक्‍य आहे. महिन्याला 24 हजार 300 युनिट वीज विद्यापीठात तयार होईल. ही वीज महावितरणला विकली जाईल. त्यातून शिवाजी विद्यापीठाचे वीज बील व महावितरणला विद्यापीठाकडून मिळालेली वीज याचा ताळमेळ घालून बील दिले जाईल किंवा युनिट जास्त झाले तर ते पुढील महिन्याच्या बिलात धरले जाईल असा करार महावितरण व विद्यापीठात झाला आहे. 
 

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com