लोकसभेला सर्वजण मला मदत करणार : धनंजय महाडिक 

राष्ट्रवादी कॉंग्रेसचे जिल्ह्यातील नेते आमदार हसन मुश्रीफ यांच्यासह सर्व नेत्यांचा मला आदर आहे. त्यामुळे आपला स्वभाव पाहता लोकसभा निवडणुकीत आपणास सर्वजण मदत करतील, असा विश्‍वास खासदार धनंजय महाडिक यांनी पत्रकारांशी बोलताना व्यक्‍त केला.
लोकसभेला सर्वजण मला मदत करणार : धनंजय महाडिक 

कोल्हापूर : राष्ट्रवादी कॉंग्रेसचे जिल्ह्यातील नेते आमदार हसन मुश्रीफ यांच्यासह सर्व नेत्यांचा मला आदर आहे. त्यामुळे आपला स्वभाव पाहता लोकसभा निवडणुकीत आपणास सर्वजण मदत करतील, असा विश्‍वास खासदार धनंजय महाडिक यांनी पत्रकारांशी बोलताना व्यक्‍त केला.

महापालिकेच्या राजकारणापासून आपण पहिल्यापासून अलिप्त राहिलो आहे. स्थायी समिती सभापतीपदाच्या निवडणुकीत राष्ट्रवादी कॉंग्रेसचे नगरसवेक फुटल्याने पक्षाचे निश्‍चितपणे नुकसान झाले आहे, असेही त्यांनी सांगितले. 

महापालिकेत सध्या गाजत असलेल्या राजकारणाबद्दल विचारले असता ते म्हणाले, लोकसभेची निवडणूक झाल्यापासून आपण महापालिकेच्या राजकारणापासून अलिप्त राहण्याचा निर्णय घेतला आहे. मला सर्वच राजकीय पक्षांच्या कार्यकर्त्यांनी मदत केली आहे. त्यामुळे आपण स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीपासून थोडे बाजुलाच राहिलो आहे. याची कल्पना आपण पक्षाचे नेते खासदार शरद पवार यांनाही दिली होती. महापालिकेतील एकाही नगरसेवकांनी सांगावे की आपण त्यांच्या विरोधात प्रचार केला आहे. आपण सांगेल ते ऐकावयास तयार आहे. जिल्हा परिषद निवडणुकीतही आपली हीच भूमिका होती. सध्या महापालिकेच्या राजकारणात एकमेकांना धक्‍के देण्याचे काम सुरू आहे. लोकशाहीमध्ये प्रत्येकाला स्वतंत्र निर्णय घेण्याचा अधिकार आहे. आपण त्यात काय बोलणार. मात्र घडलेल्या घटनांशी आपला काहीही संबंध नाही. आणि कोणाशी संपर्कही नाही. त्यामुळे कोण काय बोलते याकडे लक्ष देण्याची आवश्‍यकता आहे, असे मला वाटत नाही. महापालिकेच्या राजकारणात जे काही घडले त्यामुळे राष्ट्रवादी कॉंग्रेस पक्षाचे नुकसानच झाले आहे. आगामी लोकसभा निवडणुकीतील उमेदवारीबाबत विचारले असता त्यांनी यावर बोलण्यास स्पष्टपणे नकार दिला. आज याठिकाणी राजकीय आपण काही बोलणार नाही. अजून त्याला वेळ आहे. परंतू आपला स्वभाव पाहता मला खात्री आहे की लोकसभेच्या निवडणुकीत सर्वजण मला मदत करतील. 

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com