kolhapur corporator disqualifaiction issue | Sarkarnama

कोल्हापुरचे 20 नगरसेवक अपात्र, मात्र कॉंग्रेस- राष्ट्रवादीच्या सत्तेला धोका नाही! 

सरकारनामा ब्युरो
गुरुवार, 23 ऑगस्ट 2018

जातपडताळणी प्रमाणपत्र सादर न केल्यामुळे कोल्हापूर महापालिकेचे 20 सदस्य अपात्र ठरविण्याचा निर्णय आज सर्वोच्च न्यायालयाने दिला. त्यामुळे खळबळ उडाली आहे, मात्र यामुळे कॉंग्रेस- राष्ट्रवादीच्या सत्तेला कोणताही धोका नसल्याचा दावा कॉंग्रेस आमदार सतेज पाटील यांनी केला आहे. 

पुणे: जातपडताळणी प्रमाणपत्र सादर न केल्यामुळे कोल्हापूर महापालिकेचे 20 सदस्य अपात्र ठरविण्याचा निर्णय आज सर्वोच्च न्यायालयाने दिला. त्यामुळे खळबळ उडाली आहे, मात्र यामुळे कॉंग्रेस- राष्ट्रवादीच्या सत्तेला कोणताही धोका नसल्याचा दावा कॉंग्रेस आमदार सतेज पाटील यांनी केला आहे. 

कोल्हापूर महापालिकेत सतेज पाटील यांच्या नेतृत्वाखालील सत्ता आहे. ही सत्ता हिसकावण्याचा प्रयत्न महसूलमंत्री चंद्रकांत पाटील यांच्याकडून सातत्याने सुरु आहे, मात्र त्यांना यात यश आले नाही. दरम्यान, आज सर्वोच्च न्यायालयाने जातपडताळणी सादर न केलेल्या सदस्यांबाबत निर्णय दिला. हा निर्णय राज्याला लागू असलातरी त्याचा सर्वाधिक परिणाम कोल्हापुरात दिसणार आहे. 20 पैकी 12 ते 13 सदस्य कॉंग्रेस राष्ट्रवादीचे आहेत. त्यामुळे सत्ताबदल होणार का, अशी चर्चा सुरु झाली आहे. 

दरम्यान, आमदार सतेज पाटील यांनी सत्तेला कोणताही धोका नसल्याचे म्हटले आहे. हा विषय एका पक्षापुरता मर्यादित नाही. सर्वपक्षांचे सदस्य अपात्र झाले आहेत. त्यामुळे शासनाने कायदा करुन निर्णय घ्यावा, अशी मागणी त्यांनी केली आहे. 

संबंधित लेख