Kolhapur congress leaders forget differences and unite | Sarkarnama

कोल्हापुर  जिल्ह्यातील कॉंग्रेस नेत्यांतील मतभेद आजपासून संपले !

सुनील पाटील : सरकारनामा 
सोमवार, 30 जुलै 2018

येथून पुढे हातात-हात घालून येणाऱ्या प्रत्येक संकटाला गुंडाळून नेत कोल्हापूर जिल्ह्यात कॉग्रेस भक्कम करण्याचा निर्धार महापौर शोभा बोंद्रे, माजी मंत्री कल्लाप्पाण्णा आवाडे, जिल्हा कॉंग्रेसचे अध्यक्ष पी.एन. पाटील, माजी मंत्री प्रकाश आवाडे, माजी समाजकल्याण मंत्री जयवंतराव आवळे यांनी केला. 

कोल्हापूर  : जिल्ह्यातील कॉंग्रेस नेत्यांतील मतभेद आजपासून संपले. येथून पुढे हातात-हात घालून येणाऱ्या प्रत्येक संकटाला गुंडाळून नेत कोल्हापूर जिल्ह्यात कॉग्रेस भक्कम करण्याचा निर्धार महापौर शोभा बोंद्रे, माजी मंत्री कल्लाप्पाण्णा आवाडे, जिल्हा कॉंग्रेसचे अध्यक्ष पी.एन. पाटील, माजी मंत्री प्रकाश आवाडे, माजी समाजकल्याण मंत्री जयवंतराव आवळे यांनी आज केला. 

कॉंग्रेस कमिटीच्या नूतन सभागृहाच्या पायाभरणी समारंभात जिल्ह्यातील कॉंग्रेस नेत्यांमध्येही ऐक्‍याची पायाभरणी करण्यात आली.  जिल्ह्यातील कॉंग्रेस नेत्यांमध्येही ऐक्‍याची पायाभरणी करण्यात आली. 

कॉग्रेस-राष्ट्रवादीचा बालेकिल्ला असणाऱ्या कोल्हापूर जिल्ह्यात अंतर्गत बंडाळीमुळे एकही आमदार निवडूण आला नाही. याला स्वत:लाच दोष देत कॉग्रेसच्या सर्वच नेत्यांनी मोठेपणा दाखला. ज्यांनी लोकांची दिशाभूल केली. थापा मारल्या असा पक्ष सत्तेत आला आहे. दरम्यान, आपल्यातील अंतर्गत वादाचा फटका कार्यकर्त्यांना आणि पक्षालाही बसला आहे. 

आपण सर्वजण एक असतो तर जिल्हा परिषदेसह इतर स्थानिक स्वराज्य संस्थांमध्ये एकतर्फी सत्ता कॉग्रेसची असती. हे आपण विसरुन गेल्यामुळेच इतरांनी संधी साधली. कोण इकडे गेला कोण तिकडे गेला अस करत आपण कार्यकर्त्यांना अस्वस्थ केले. आता कोणत्याही कार्यकर्त्याने अस्वस्थ व्हायचे नाही. तर, हातात-हात घालून येणाऱ्या प्रत्येक संकटाला गुंडाळून लावू असा निर्धार कॉंग्रेसच्या सर्वच नेत्यांनी आज कोल्हापूर येथे केला. 

 

संबंधित लेख