Kolhapur Congress Criticism on Chandrakant Patil | Sarkarnama

चंद्रकांत दादा भ्रमिष्ट : कोल्हापूर काँग्रेस अध्यक्ष पी. एन. पाटील

सरकारनामा ब्युरो
गुरुवार, 26 जुलै 2018

कोल्हापुरातील दसरा चौकात मराठा समाजाच्या आरक्षणासाठी बेमुदत धरणे आंदोलन सुरू आहे. या आंदोलनात काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष पी. एन. पाटील यांनी भाग घेऊन सरकारला इशारा दिला. शासनाने तातडीने आरक्षण दिले नाहीतर प्रसंगी मंत्र्यांच्या गाड्या फोडू मात्र आरक्षण घेतल्याशिवाय राहणार नाही अशी भूमिका पाटील यांनी मांडली. 

कोल्हापूर : ''मराठा आरक्षणासाठी चंद्रकांत पाटील यांनी विधिमंडळात आंदोलन केले होते. मराठा आरक्षणाचा फलक गळ्यात बांधून त्यांनी आंदोलन केले होते. मंत्री झाल्यानंतर त्यांची भाषा बदलली आहे. मराठा आंदोलनात भाडोत्री लोक घुसल्याच्या त्यांनी आरोप केला आहे. ते भ्रमिष्ट झाल्यानेच असा आरोप करत आहेत," अशी टीका, काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष पी. एन. पाटील यांनी केली.

कोल्हापुरातील दसरा चौकात मराठा समाजाच्या आरक्षणासाठी बेमुदत धरणे आंदोलन सुरू आहे. या आंदोलनात पाटील यांनी भाग घेऊन सरकारला इशारा दिला. मराठा समाज अत्यंत कठीण काळातून जात आहे. समाजातील गरिबाला आरक्षणाची अत्यंत गरज आहे. आरक्षणाची मागणी करून करून  समाजाच्या सहनशीलतेचा अंत झाला आहे.  शासनाने तातडीने आरक्षण दिले नाहीतर प्रसंगी मंत्र्यांच्या गाड्या फोडू मात्र आरक्षण घेतल्याशिवाय राहणार नाही अशी भूमिका पाटील यांनी मांडली. 

संबंधित लेख