एक थोबाडीत मारल्यावर दुसरे थोबाड पुढे करणारा मी नाही : चंद्रकांतदादा 

तावडे हॉटेल परिसरातील महापालिकेच्या जागेतील अतिक्रमण हटवण्यावरून झालेल्या आरोपावरून पालकमंत्री चंद्रकांतदादा पाटील यांचा रूद्रावतारच आज पहायला मिळाला.
एक थोबाडीत मारल्यावर दुसरे थोबाड पुढे करणारा मी नाही : चंद्रकांतदादा 

कोल्हापूर : तावडे हॉटेल परिसरातील महापालिकेच्या जागेतील अतिक्रमण हटवण्यावरून झालेल्या आरोपावरून पालकमंत्री चंद्रकांतदादा पाटील यांचा रूद्रावतारच आज पहायला मिळाला.

मुंगीवर पाय ठेवला तर तीही चावते, एक थोबाडीत मारल्यावर दुसरे थोबाड पुढे करणारा मी नाही, माझ्या गुरूंनी मला सांगितले आहे की, राक्षस झोपला आहे, त्याला उठवू नका, पण मी आता उठलोय, प्रत्येक प्रकरणाची खोलात जाऊन चौकशी करणार, असा इशारा त्यांनी यावेळी महापालिकेतील विरोधकांना दिला. 

ते म्हणाले, "माध्यमांचे आणि विरोधकांचेही मला कळत नाही. मी स्वस्त चपाती भाजी केंद्र काढले, आडेवाटेवरचं कोल्हापूर उपक्रम सुरू केला, 17 मुलांवर मुंबईत नेऊन शस्त्रक्रिया केल्या, त्याचे अभिनंदन नाही किंवा त्यावर बोलत नाहीत, केवळ विरोधासाठी विरोध चालू आहे. त्याच्यातून काही निष्पन्न होणार नाही. याचा विचार विरोधकांनी करावा. आता मी जागा झाल्यामुळे मी त्यांना सोडणार नाही. महापालिकेतील यापुर्वीच्या सगळ्या प्रकरणांच्या मुळाशी जाणार आहे.' 

"माझ्या गुरूंनी मला सांगितले आहे की, हा राक्षस आहे, तो झोपलेला आहे, त्याला उठवू नका, तर आता मी उठलोय असा इशारा देऊन श्री. पाटील म्हणाले,"मी कसा हे महाराष्ट्राने बघितले, विधानपरिषदेने मला पाहीले आहे, महाराष्ट्राच्या जनेतेने आणि तुम्हीही पाहीले आहे. शांत बसलो म्हणजे काय समजता. चांगले आणि सकारात्मक कार्यक्रम किंवा खूप चांगले काम केले तर त्याचे मतात परिवर्तन होते का नाही हे मला माहित नाही पण त्याचे समाधान मिळते, यातूनच आडेवाटेवरचं कोल्हापूर, पाच रूपयांत चपाती भाजी हे उपक्रम सुरू केले. त्यामुळे कोण काय बोलते याकडे मी पहातच नाही. लोकांना पूरक असा निर्णयघेणे हे सरकारचे काम आहे.'  

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com