kolhapur-amrishsingh-ghatage-samarjitsingh-ghatage | Sarkarnama

अंबरिशसिंह घाटगे यांच्या वाढदिवसाला समरजितसिंहांची चर्चा 

सुनील पाटील 
सोमवार, 17 सप्टेंबर 2018

शिवसेनेचे नेते आणि माजी आमदार संजयबाबा घाटगे हे कानदुखीमुळे कोल्हापूर येथील खासगी रूग्णालयात उपचार घेत आहेत. यापार्श्‍वभूमीवर भाजपचे नेते आणि म्हाडाचे अध्यक्ष समरजितसिंह घाटगे यांनी रूग्णालयात जावून संजयबाबा यांच्या तब्बेतीची विचारपूस केली. त्यामुळे, व्हनाळी (ता. कागल) येथे आजच संजयबाबा घाटगे यांचे चिरंजीव आणि जिल्हा परिषदेचे शिक्षण सभापती अंबरिशसिंह घाटगे यांचा धामधूमीत सुरू असणाऱ्या वाढदिवसाऐवजी समरजितसिंह घाटगे संजयबाबांना भेटले याचीच चर्चा कागलसह जिल्ह्यात सुरू आहे. 

कोल्हापूर : शिवसेनेचे नेते आणि माजी आमदार संजयबाबा घाटगे हे कानदुखीमुळे कोल्हापूर येथील खासगी रूग्णालयात उपचार घेत आहेत. यापार्श्‍वभूमीवर भाजपचे नेते आणि म्हाडाचे अध्यक्ष समरजितसिंह घाटगे यांनी रूग्णालयात जावून संजयबाबा यांच्या तब्बेतीची विचारपूस केली. त्यामुळे, व्हनाळी (ता. कागल) येथे आजच संजयबाबा घाटगे यांचे चिरंजीव आणि जिल्हा परिषदेचे शिक्षण सभापती अंबरिशसिंह घाटगे यांचा धामधूमीत सुरू असणाऱ्या वाढदिवसाऐवजी समरजितसिंह घाटगे संजयबाबांना भेटले याचीच चर्चा कागलसह जिल्ह्यात सुरू आहे. 

कागलमध्ये संजयबाबा घाटगे यांचा "बाबा गट' आणि समरजितसिंह घाटगे यांचा "राजे गट' आहे. कोणत्याही निवडणूकीत हे दोन्ही गट परस्पर विरोधी असतात. 2019 च्या विधानसभेसाठी कागल तालुक्‍यातून भाजपकडून समरजितसिंह घाटगे आणि शिवसेनेकडून संजयबाबा घाटगे निवडणूक रिंगणात असतील असा अंदाज बांधला जात आहे. त्यामुळे समरजितसिंह घाटगे संजयबाबांकडे जातील हे कोणच्या ध्यानीमणीही नव्हते. याउलट गेल्या चार दिवसापासून कानदुखीमूळे त्रस्त असणाऱ्या संजयबाबांना भेटण्यासाठी समरजिसिंह घाटगे यांना अंबरिशसिंह घाटगे यांच्याच वाढदिवसाचा मुर्हूत मिळेल असेही कोणाला वाटले नव्हते. त्यामुळे वाढदिवस जरी संजयबाबा यांच्या चिरंजीवाचा असला तरीही चर्चा मात्र समरजितसिंह घाटगे यांचीच सुरू राहिली. 

जि.प. शिक्षण सभापती अंबरिशसिंह घाटगे यांच्या वाढदिवसानिमित्त "बाबा गटा'सह त्यांना मानणाऱ्या इतर कार्यकर्त्यांनीही जोरदार तयारी केली आहे. कागल तालुक्‍यात बाबा गटाला मानणाऱ्या प्रत्येक गावात डिजिटल फलक झळकत आहेत. अनेक दिवसांपासून संपूर्ण कागल तालुक्‍यात अंबरिशसिंह घाटगे यांच्या वाढदिवसाची तयारी सुरू आहे. त्यानियोजनानूसार आज वाढदिवस साजरा केला जात असातना अंबरिषसिंह घाटगेंच्या वाढदिवसाऐवजी संजयबाबा घाटगे यांना भेटायला गेल्यामुळे अंबरिशसिंह घाटगेंऐवजी समरजितसिंह घाटगे यांचीच चर्चेने सोशल मिडियावर जोर धरला आहे.
 

संबंधित लेख