knife attack on engineer in satara | Sarkarnama


ब्रेकिंग न्यूज

पुणे : धनगर समाजाच्या आरक्षणासाठी शिवसेना पक्ष प्रमुख उद्धव ठाकरे दिनांक 21 फेब्रवारी रात्री 8 वाजता धनगर समाजाच्या शिष्टमंडळासह मुख्यमंत्र्यांना भेटणार.'

जिहे कठापुर योजनेच्या इंजिनिअरवर बॉम्बे रेस्टॉरंट चौकात चाकूहल्ला

सरकारनामा ब्युरो
शुक्रवार, 21 सप्टेंबर 2018

संशयितांनी धारदार चाकूने मुंजाप्पा यांच्या हातावर, पाटीवर वार केले.

सातारा : जिममधून घरी निघालेल्या जिहे कठापुर योजनेच्या इंजिनिअरवर धारदार चाकूने हल्ला करून जखमी केल्याची घटना साताऱ्यातील बॉम्बे रेस्टॉरंट चौकात ही घटना घडली आहे.  विनोद मुंजाप्पा (वय 34, रा. आदित्यनगरी, खेड, सातारा) असे जखमीचे इंजिनिअरचे नाव आहे.  

विनोद मुंजाप्पा (वय 34, रा. आदित्यनगरी, खेड) हे आज सकाळी कारमधून सातारा क्लबमध्ये व्यायामाला गेले होते. व्यायाम झाल्यानंतर ते कारमधून एकटेच निघाले होते. यावेळी बॉम्बे रेस्टॉरंट येथे कार आल्यानंतर त्यांना समोरून आलेल्या कारने गाडी आडवी मारून थांबविले. यावेळी संशयितांनी धारदार चाकूने मुंजाप्पा यांच्या हातावर, पाटीवर वार केले. या हल्ल्यापासून वाचण्यासाठी ते तेथून पळून गेले. त्यानंतर हल्लेखोरही घटनास्थळावरून पळून गेले. 

सातारा शहर पोलिसांना या घटनेची माहिती मिळाल्यावर त्यांनी घटनास्थळी धाव घेतली. दरम्यान, जखमीवर खासगी रुग्णालयात उपचार सुरू असून घटनेचे कारण समोर आलेले नाही. या घटनेमुळे खळबळ उडाली आहे.

संबंधित लेख