पनवेलमध्ये शेकापला धक्का, केके म्हात्रेंसह तीन नगरसेवकांचा भाजपत प्रवेश 

पनवेलमध्ये शेकापला धक्का, केके म्हात्रेंसह तीन नगरसेवकांचा भाजपत प्रवेश 

नवी मुंबई : पनवेलमध्ये शेतकरी कामगार पक्षाला धक्का बसला आहे. शेतकरी कामगार पक्षाचे नेते केके म्हात्रे यांच्यासह तीन नगरसेवकांनी भाजपमध्ये प्रवेश केला आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थितीत मुंबईत हा पक्षप्रवेश झाला. यावेळी माजी खासदार रामशेठ ठाकूर, आमदार प्रशांत ठाकूर, महेश बालदी हे उपस्थित होते. 

शेतकरी कामगार पक्षातील गटबाजीला आणि आमदार बाळाराम पाटील यांच्या नेतृत्वावर शेतकरी कामगार पक्षाचे नेते केके म्हात्रे हे नाराज होते. त्यांनतर केके म्हात्रे यांनी खासदार रामशेठ ठाकूर आणि पनवेलचे आमदार प्रशांत ठाकूर यांची भेट घेवून भाजपमध्ये प्रवेश करण्याची मानसिकता तयार केली होती. त्यावरून त्यांनी आज त्यांच्या तीन नगरसेवकांसमवेत भाजपमध्ये प्रवेश केला.

त्यांच्या या प्रवेशाने पनवेलमध्ये शेकापला मोठं धक्का बसला आहे. ऐन निवडणुकीच्या तोंडावर हा प्रवेश झाल्याने राष्ट्रवादीचे उमेदवार पार्थ पवार यांना याचा मोठं फटका बसणार आहे. म्हात्रे यांच्यासोबत शेकापच्या नगरसेविका शीला भगत, हेमलता गोवारी,रवी गोवारी, प्रसिद्ध उद्योगपती रवीं गोवारी यांनी भाजपात प्रवेश केला आहे. 
 

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com