kitit somaiya mp bjp | Sarkarnama

आजचा वाढदिवस : किरीट सोमय्या, खासदार, भाजप

सरकारनामा ब्युरो
सोमवार, 12 फेब्रुवारी 2018

किरीट सोमय्या यांचा जन्म मध्यमवर्गीय कुटुंबात मुंबईत झाला. विद्यार्थी कार्यकर्ता म्हणून त्यांनी सुरवात केली. 1975 मध्ये जयप्रकाश नारायण यांच्या चळवळीतून ते राजकारणात आले. नंतर त्यांनी भाजपमध्ये प्रवेश केला. मेधा सोमय्याशी त्यांचा विवाह झाला. 1979 मध्ये त्यांनी चार्टर्ड अकाउंट्‌सची पदवी घेतली आहे. 2005 मध्ये मुंबई विद्यापीठातील डॉक्‍टरेट ही त्यांना देण्यात आली. किरीट सोमय्या हे मुंबई उत्तर पूर्व लोकसभा मतदारसंघाचे प्रतिनिधित्व करीत आहेत. त्यांनी राष्ट्रवादी कॉंग्रेसचे संजय दीना पाटील यांना पराभूत केले होते. 1995 मध्ये ते मुलुंड विधानसभा मतदारसंघातून आमदार झाले होते.

किरीट सोमय्या यांचा जन्म मध्यमवर्गीय कुटुंबात मुंबईत झाला. विद्यार्थी कार्यकर्ता म्हणून त्यांनी सुरवात केली. 1975 मध्ये जयप्रकाश नारायण यांच्या चळवळीतून ते राजकारणात आले. नंतर त्यांनी भाजपमध्ये प्रवेश केला. मेधा सोमय्याशी त्यांचा विवाह झाला. 1979 मध्ये त्यांनी चार्टर्ड अकाउंट्‌सची पदवी घेतली आहे. 2005 मध्ये मुंबई विद्यापीठातील डॉक्‍टरेट ही त्यांना देण्यात आली. किरीट सोमय्या हे मुंबई उत्तर पूर्व लोकसभा मतदारसंघाचे प्रतिनिधित्व करीत आहेत. त्यांनी राष्ट्रवादी कॉंग्रेसचे संजय दीना पाटील यांना पराभूत केले होते. 1995 मध्ये ते मुलुंड विधानसभा मतदारसंघातून आमदार झाले होते. 1999 मध्ये त्यांनी कॉंग्रेसचे विद्यमान खासदार गुरुदास कामत यांना पराभूत केल होते. संसदेत ते अत्यंत सक्रिय सदस्य आहेत. त्यांच्या कार्यकाळात त्यांनी आतापर्यंत अनेक विषयांवर एकूण 832 प्रश्न उपस्थित केले आहेत. 

हिपॅटायटीस बी लस त्यांनी 32 लाख पेक्षा अधिक जणांना अल्प किमतीत मुंबईकरांना दिली. त्याची लिम्का बुक ऑफ रेकॉर्डमध्ये नोंद झाली. "मोतीबिंदू मुक्त मुंबई' मोहीम त्यांनी मुंबईभर राबविली. रेल्वे प्रवासी सुरक्षा अभियान - मुंबईच्या रेल्वे स्थानकांवरील सुरक्षेच्या मुद्यांचे समाधान करण्यासाठी मुंबईतील 50 हजार रेल्वे प्रवाशांनी सह-स्वाक्षरी केलेले निवेदन त्यांनी संसदेत सादर केले. गेल्या तीन दशकांहून अधिक काळ ते राजकारणात सक्रिय आहेत. 

संबंधित लेख