kishor will join congress party | Sarkarnama

शिवसेनेचे किशोर जोरगेवार कॉंग्रेसच्या वाटेवर ? 

श्रीकांत पेशेट्टीवार
शुक्रवार, 31 ऑगस्ट 2018

चंद्रपूर : शिवसेनेचे चंद्रपूर उपजिल्हा प्रमुख किशोर जोरगेवार यांचा कॉंग्रेस प्रवेश जवळपास निश्‍चित झाला आहे. त्यांनी नुकतीच प्रदेशाध्यक्ष अशोक चव्हाण व राज्याचे कॉंग्रेस प्रभारी मल्लिकार्जुन खरगे यांची भेट घेतली. मूळ भाजपचे असलेले किशोर जोरगेवार यांनी गेल्या विधानसभा निवडणुकीपूर्वी शिवसेनेत प्रवेश केला होता. 2014 मध्ये शिवसेनेचे उमेदवार म्हणून त्यांनी चंद्रपूर विधानसभा मतदारसंघात दुसऱ्या क्रमाकांची मते घेतली होती. किशोर जोरगेवार अनेक वर्षांपासून भाजपचे कार्यकर्ते होते. 

चंद्रपूरमध्ये भाजपचे संघटन बांधण्यात जोरगेवार यांची प्रमुख भूमिका राहिली आहे. चंद्रपूर विधानसभा मतदारसंघ अनुसूचित जातीसाठी राखीव झाल्यानंतर त्यांनी भाजपकडे उमेदवारी मागितली परंतु त्यांच्याऐवजी नितीन गडकरी यांचे विश्‍वासू असलेल्या नागपुरातील नाना शामकुळे यांना भाजपने उमेदवारी दिली. 2014 मध्येही पुन्हा शामकुळे यांनाच भाजपने उमेदवारी दिल्याने जोरगेवार यांनी बंडखोरी करून शिवसेनेची उमेदवारी घेतली होती. 

शिवसेनेतही योग्य जबाबदारी न मिळाल्याने ते काही महिन्यांपासून नाराज होते. जोरगेवार यांना कॉंग्रेसमध्ये आणण्यासाठी काही महिन्यांपासून प्रदेशाध्यक्ष अशोक चव्हाण आग्रही होते. त्यांनी जोरगेवार यांच्याकडे निरोप पाठवून मुंबईत भेटीसाठी बोलाविले होते. प्राथमिक चर्चा झाल्यानंतर जोरगेवार यांनी काही दिवसांपूर्वीच कॉंग्रेसचे प्रदेशाध्यक्ष अशोक चव्हाण व राज्याचे प्रभारी मल्लिकार्जुन खरगे यांची मुंबईत भेट घेतली. यावेळी त्यांनी चंद्रपूर विधानसभेची कॉंग्रेसची उमेदवारी देण्याचा "शब्द' अशोक चव्हाण व खरगे यांनी दिल्याचे समजते. कॉंग्रेसच्या दोन्ही नेत्यांशी सकारात्मक चर्चा झाली आहे. चंद्रपूर येथील कार्यकर्त्यांशी बोलून कॉंग्रेस प्रवेशाबाबत आपण लवकरच निर्णय घेणार असल्याचे जोरगेवार यांनी "सरकारनामा'शी बोलताना सांगितले. 
 
संबंधित लेख