kirit somayya mad parmeshwar kadam | Sarkarnama

किरीट सोमैय्या मनोरूग्ण, त्यांना रुग्णालयात दाखल करा : कदम 

ब्रह्मा चट्टे 
गुरुवार, 26 ऑक्टोबर 2017

मुंबई : मुंबई महापालिकेतील तीन नगरसेवकांच्या पळवा पळवी नंतर आरोप प्रत्यारोपाची स्पर्धा लागली आहे. भाजप खासदार किरीट सोमय्या हे मनोरुग्णं बनले असून त्यांना तातडीने रूग्णालयात दाखल करावे अशी मागणी मनसचे बंडखोर नगरसेवक परमेश्वर कदम यांनी थेट अप्पर पोलीस आयुक्त लाचलुचपत प्रतिबंधक विभाग वरळी यांच्याकडे पत्रे देऊन केली आहे. 

मुंबईच्या महापौरपदावर डोळा ठेवणाऱ्या भाजपने शिवसेनेने पैसे देवून नगरसेवक विकत घेतले असा आरोप केला आहे. तसेच यामध्ये मोठा आर्थिक व्यवहार झाल्याचा आरोप करत याची लाच लुचपत विभागाकडे तक्रारही केली आहे. या प्रकारानंतर आता किरीट सोमय्या वेडा झाल्याचे प्रतिउत्तर दिले आहे. मुंबई महापालिकेत भाजपचा महापौर बसवण्याचे सौमय्यांचं स्वप्न पूर्ण होऊ शकले नाही. त्यांनी आमच्यावर आरोप केले आहे. त्या आरोपांची दखल घेवून आमची चौकशी करावी. त्यात काहीही मिळणार नसल्याचा दावाही कदम यांनी केला आहे. आपल्या मतदारसंघातील नगरसेवक शिवसेनेत गेल्यामुळे सोमय्याना भीती वाटते. त्यामुळे किरीट सौमय्या मनोरूग्ण बनले आहेत. त्यांना रूग्णालयात दाखल अशी मागणीही शेवटी कदम यांनी केली आहे. 

संबंधित लेख