नगरच्या पालकमंत्र्यांनी काढला 'सातबारा'

केवळ एका क्लिकवर कोणत्याही नागरिकांना त्यांना हवी असणारी कागदपत्रे मिळणार आहेत.
नगरच्या पालकमंत्र्यांनी काढला 'सातबारा'

नगर : जमिनीचा सातबारा व आठ-अ, फेरफार आदी महत्त्वाचे कागदपत्रे आता एका क्लिकवर मिळणार आहेत. त्यासाठी असणारी कीऑस्क प्रणाली नगरमध्ये सुरू करण्यात आली.

पालकमंत्री राम शिंदे यांच्या हस्ते या प्रणालीचे उदघाटन काल झाले. या वेळी त्यांनी स्वतःच्या जमिनीचा सातबारा या प्रणालीद्वारे काढला. तर आमदार बाळासाहेब मुरकुटे यांनी त्यांच्या जमिनीचे फेरफार काढले. 

जिल्हाधिकारी राहुल द्विवेदी यांनी या प्रणालीची सविस्तर माहिती दिली. केवळ एका क्लिकवर कोणत्याही नागरिकांना त्यांना हवी असणारी कागदपत्रे मिळणार आहेत. जिल्हाधिकारी राहुल द्विवेदी यांच्या संकल्पनेतून ही सुविधा सुरू करण्यात आली आहे. जमिनीचा सातबारा, आठ अ खाते उतारा, जन्म-मृत्यू नोंदी, इनामपत्रक आदी दस्ताएवज याद्वारे मिळणार आहे. १९३० पासून ते २०१३ पर्य़ंतची तब्बल पावणेदोन कोटी कागदपत्रांचे (जुने अभिलेख) स्कॅनिंग त्यासाठी करण्यात आले असून, तो डाटा या प्रणलीत साठविण्यात आला आहे. यात जुने गटनंबर आणि जुने सर्वे नंबर उपलब्ध आहेत.  

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com