The Killer who shot at Narendra Dabholkar Arrested | Sarkarnama

नरेंद्र दाभोलकरांवर गोळी झाडणाऱ्याला औरंगाबादमधून अटक

सरकारनामा ब्युरो
शनिवार, 18 ऑगस्ट 2018

डॉ.नरेंद्र दाभोलकर आणि कॉम्रे़ड गोविंद पानसरे यांच्या हत्येला पाच वर्ष पूर्ण होत आहेत आणि आता कुठे त्यांच्या मारेकऱ्यांना शोधण्यात सीबीआयला यश आलं आहे. दरम्यान, सीबीआय आता आरोपीची कसून चौकशी करत आहेत.

औरंगाबाद : नरेंद्र दाभोलकर हत्या प्रकरणात सीबीआयने मोठी कारवाई केली आहे. नरेंद्र दाभोलकरांवर गोळी झाडणा-याला सीबीआयकडून अटक करण्यात आली आहे. सचिन अंधुरे असं अटक केलेल्या आरोपीचं नाव आहे. औरंगाबादमधून सचिन अंधुरेला सीबीआयने ताब्यात घेतलं आहे. तब्बल 5 वर्षानंतर दाभोळकर हत्या प्रकरणात दुसऱ्या आरोपीला अटक करण्यात आली आहे.

औरंगाबाद येथून 14 तारखेला रात्री सचिन अंधुरे या आरोपील अटक करण्यात आली आहे. सचिन अंधुरेला आई वडील नसून एक मोठा भाऊ आहे. तो विवाहित आहे त्याला 2 मुलं आहेत. औरंगाबादेतील रोजा बझार भागातील तो रहिवासी आहे.

डॉ.नरेंद्र दाभोलकर आणि कॉम्रे़ड गोविंद पानसरे यांच्या हत्येला पाच वर्ष पूर्ण होत आहेत आणि आता कुठे त्यांच्या मारेकऱ्यांना शोधण्यात सीबीआयला यश आलं आहे. दरम्यान, सीबीआय आता आरोपीची कसून चौकशी करत आहेत. त्यामुळे यात आणखी कोणाचा हात आहे का आणि कोणाच्या या सांगण्यावरून हे सगळं करण्यात आलं आता याचाही लवकरच उलगडा होईल का याकडेच सगळ्यांचं लक्ष लागलं आहे.

अधिक राजकीय बातम्यांसाठी सरकारनामा अॅप डाऊनलोड करा
Play Store    App Store

संबंधित लेख